Home /News /crime /

डोमिनिकाच्या तुरुंगात कोणत्या अवस्थेत आहे मेहुल चोक्सी, बघा EXCLUSIVE फोटो

डोमिनिकाच्या तुरुंगात कोणत्या अवस्थेत आहे मेहुल चोक्सी, बघा EXCLUSIVE फोटो

पीएनबी बँक (PNB Scam) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi)चा तुरुंगातील EXCLUSIVE फोटो व्हायरल झाला आहे.

    नवी दिल्ली, 30 मे: पीएनबी बँक (PNB Scam) घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) ला मंगळवारी डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Criminal Investigation Department) अटक केली. त्यानंतर मेहुल चोक्सी सध्या डोमिनिकाच्या तुरुंगात आहे. तुरंगातला त्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या सुनावणीत मेहुल चोक्सीला डोमिनिका सरकार अँटिग्वाकडे (Antigua) सोपवणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचवेळी चोक्सीचे वकील विजय अगरवाल यांनी त्याला मारहाण झाल्याचा दावा केला होता. दरम्यान समोर आलेल्या फोटोंमध्ये चोक्सीच्या हातावर मारहाणीचा खुणा दिसून येत आहे. मेहुल चोक्सीचा तुरुंगातील फोटो समोर आला आहे. तर दुसऱ्या फोटोत त्याच्या हातावर मारहाणीच्या खुणाही दिसत आहे. वकिलांनी केला होता मारहाणीचा दावा मेहुल चोक्सीला जबरदस्तीनं डोमिनिका येथे नेण्यात आल्याचं त्याच्या वकिलानं म्हटलं. तसंच चोक्सीच्या शरीरावर काही खुणा आहेत, असा दावाही त्याच्या वकिलांनी गुरुवारी केला होता. अगरवाल यांनी आरोप केला होता की चोक्सीच्या शरीरावर ‘अत्याचाराच्या खुणा’ आहेत. त्यानंतर डोमिनिका येथील चोक्सीचे वकील वेन मार्श यांनी या वृत्ताल दुजोरा दिला होता. त्यांनी शरीरावर असलेल्या खुणांची स्पष्टता केली. चोक्सी यांचे डोळे सुजलेले आणि शरीरावर काही ठिकाणा खुणा दिसल्याचं मार्श यांनी सांगितलं. दरम्यान समोर आलेल्या फोटोंमध्ये त्याच्या हातावर खुणा आणि त्याचे डोळेही सुजलेले दिसत आहेत. भारतात आणण्याचे प्रयत्न अपयशी चोक्सीला डोमिनिका देशातून बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्याला आता परत अँटिग्वाकडे पाठवण्यात येणार असल्याचं डोमिनिकाच्या मिनिस्ट्री ऑफ नॅशनल सिक्युरिटी आणि होम अफेअर्सनं म्हटलं आहे. सुरुवातीला डोमिनिका सरकार मेहुल चोक्सीला भारतात सोपणवार असं सांगितलं होतं. आता डोमिनिका सरकारनं आपला निर्णय बदलला आहे. त्यामुळे मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचे भारताचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. मेहुल चोक्सीला भारतात आणता येऊ शकतं का?, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर चोक्सीचे वकील विजय अगरवाल यांनी म्हटलं की, मेहुल चोक्सीनं अँटिग्वाचं नागरिकत्व घेतलं आहे. तर भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. इमिग्रेशन आणि पासपोर्ट अॅक्टनुसार चोक्सीला केवळ अँटिग्वालाच परत पाठवता येऊ शकतं. मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. तीन दिवसांपूर्वी तो अँटिग्वामधून गायब झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. अँटिग्वामधून क्युबा येथे पसार झाल्याचं वृत्तही समोर आलं होतं. मात्र, आता डोमिनिकाच्या सीआयडीने त्याला ताब्यात घेतलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Photo viral, Pnb bank

    पुढील बातम्या