मुंबई, 19 मार्च : जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात रस असेल तर तुम्ही एखाद्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये (Multibagger stock) पैसे गुंतवून मोठा नफा मिळवू शकता. कोविड-19 महामारीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या दोन वर्षांत अनेक शेअर्सनी उत्कृष्ट परतावा दिला आहे. क्वालिटी फार्मास्युटिकल्स (Kwality Pharmaceuticals) हा या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. बीएसईवर लिस्टेड क्वालिटी फार्मा शेअरची किंमत गेल्या दोन वर्षांत 25.55 रुपयांवरून 404.55 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत स्टॉक सुमारे 1500 टक्के वाढला आहे. महिन्याला 10 हजार भरा आणि 16 लाख रुपये मिळवा, जाणून घ्या काय ही सुरक्षित गुंतवणूक एका वर्षात 675 टक्के वाढ मल्टीबॅगर स्टॉक गेल्या 6 महिन्यांपासून विक्रीच्या दबावात आहे. गेल्या एका महिन्यात, क्वालिटी फार्माच्या शेअरची किंमत 454.25 वरून 404.55 वर आली आहे, या कालावधीत सुमारे 11 टक्क्यांनी घसरण झाली आहे. हा मल्टीबॅगर फार्मा स्टॉक गेल्या 6 महिन्यांत जवळपास 593 रुपये ते 404 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीत सुमारे 30 टक्के घट झाली आहे. मात्र गेल्या एका वर्षात, क्वालिटी फार्मा अजूनही भारतातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. क्वालिटी फार्माचे शेअर्स गेल्या एका वर्षात 52.10 रुपयांवरून 404.55 रुपयांपर्यंत वाढले आहेत, या कालावधीत सुमारे 675 टक्के वाढ झाली आहे. Investment Tips: मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणुकीदरम्यान ‘या’ चुका टाळा 1 लाखांची गुंतवणूक झाली 16 लाख रुपये जर एखाद्याने एका महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर फार्मा स्टॉकमध्ये क्वालिटी फार्मा शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपये आज 89,000 झाले असते. गेल्या 6 महिन्यांत 70,000 रुपयांवर गेले असते. मात्र जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 7.75 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये दोन वर्षांपूर्वी 1 लाख गुंतवले असतील तर त्याचे आज 16 लाख झाले असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.