जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Multibagger Stock : 'या'' शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे महिनाभरात दुप्पट, Rakesh Jhunjhunwal यांच्या पोर्टफोलिओत समावेश

Multibagger Stock : 'या'' शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे महिनाभरात दुप्पट, Rakesh Jhunjhunwal यांच्या पोर्टफोलिओत समावेश

Multibagger Stock : 'या'' शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे महिनाभरात दुप्पट, Rakesh Jhunjhunwal यांच्या पोर्टफोलिओत समावेश

शेअर बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की DB Realty शेअरचा चार्ट पॅटर्न अजूनही तेजीचा आहे आणि तो लवकरच 120 आणि 135 च्या पातळीवर जाऊ शकतो. मात्र केवळ चार्ट पॅटर्नवर हा शेअर तेजीत असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 फेब्रुवारी : शेअर बाजारात (Share Market) चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे यावर तुमचा नफा अवलंबून असतो. त्यामुळे अनेक किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओकडे लक्ष देत असतात. अनेक स्मॉलकॅप स्टॉक्स आहेत जे 2022 च्या मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत सामील झाले आहेत. DB Realty हा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Rakesh Jhunjhunwals Portfolio) समाविष्ट असलेला असाच एक स्टॉक आहे. यावर्षी आतापर्यंत डीबी रियल्टीच्या शेअरची किंमत 48.90 रुपयांवरून 100.15 रुपयांपर्यंत वाढली आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या शेअरने 80 रुपयांच्या पातळीवर ब्रेकआऊट दिला आहे. तेव्हापासून त्यात आणखी वेग आला आहे. NSE वरील गेल्या 5 ट्रेडिंग सत्रात या शेअरने अपर सर्किट लगावले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की या शेअरचा चार्ट पॅटर्न अजूनही तेजीचा आहे आणि तो लवकरच 120 आणि 135 च्या पातळीवर जाऊ शकतो. मात्र केवळ चार्ट पॅटर्नवर हा शेअर तेजीत असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अलीकडील वाढीसाठी कोणतेही मूलभूत कारण दिसत नाही. Alert! तुमच्या अकाउंटचा Password यापैकी एक नाही ना? असेल तर लगेच करा बदल चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगाडिया म्हणतात की हा मल्टीबॅगर स्टॉक चार्ट पॅटर्नवर खूप तेजीचा दिसत आहे. मात्र 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये तो सातत्याने अप्पर सर्किट लगावत आहे. असे असतानाही यामध्ये 135 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे त्यांनी हा स्टॉक 120 रुपयांच्या पहिल्या टार्गेटसाठी आणि 135 रुपयांच्या पुढील टार्गेटसाठी होल्ड करुन ठेवावा. शेअर इंडियाचे रवी सिंग म्हणतात की DB रियल्टीचे फंडामेंटल्स त्याच्या अलीकडील रॅलीला सपोर्ट देत नाहीत. फक्त त्याचा तांत्रिक सेटअप या शेअरमधील अपट्रेंडला सपोर्ट देत आहे. डीबी रियल्टीने फंड उभारणीशी संबंधित बातम्या देखील या स्टॉकला चालना देत आहेत. Gold-Silver Price : सोन्याच्या किंमतीत आठवडाभरात वाढ, चांदी स्वस्त; चेक करा नवे दर DB Realty मधील राकेश झुनझुनवाला यांचे स्टेक FY 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत, राकेश झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या खात्याद्वारे कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे सध्या कंपनीत 2.06 टक्के हिस्सा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात