मुंबई, 5 फेब्रुवारी: भारतीय सराफा बाजारात आठवडाभरात सोन्याच्या किमतीत
(Gold Price Today) वाढ झाली, तर चांदीच्या दरात
(Silver Price Today) किंचित घट झाली. या व्यावसायिक आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 439 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 147 रुपयांची किंचित घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन
(IBJA) च्या वेबसाइटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला
(31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान) 47,834 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 48,273 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 61,074 रुपयांवरून 60,927 रुपये प्रति किलोवर आली आहे.
IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
Share Market Update : शेअर बाजारात बजेटच्या आठवड्यात बुल्सचं वर्चस्व, पुढील वाटचाल कशी असणार?
गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले?
>> 31 जानेवारी 2022 - 47,834 रुपये प्रति 10 ग्रॅम
>> 1 फेब्रुवारी 2022- 48,254 रुपये प्रति 10 ग्रॅम
>> 2 फेब्रुवारी 2022- 48,085 रुपये प्रति 10 ग्रॅम
>> 3 फेब्रुवारी 2022- 48,179 रुपये प्रति 10 ग्रॅम
>> 4 फेब्रुवारी 2022- रुपये 48,273 प्रति 10 ग्रॅम
गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला?
>> 31 जानेवारी 2022 - रुपये 61,074 प्रति किलो
>> 1 फेब्रुवारी 2022- रुपये 61,610 प्रति किलो
>> 2 फेब्रुवारी 2022- रुपये 61,430 प्रति किलो
>> 3 फेब्रुवारी 2022- 60,715 रुपये प्रति किलो
>> 4 फेब्रुवारी 2022- रुपये 60,927 प्रति किलो
Tax Saving साठी उत्तम पर्याय आहे ELSS, तुमच्या गंतवणुकीवर किती फायदा मिळेल?
कशी तपासाल सोन्याची शुद्धता?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.