• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • मुलांचं सुरक्षित भविष्य आपली जबाबदारी; भविष्यातील गरजांनुसार आजच सुरु करा गुंतवणूक

मुलांचं सुरक्षित भविष्य आपली जबाबदारी; भविष्यातील गरजांनुसार आजच सुरु करा गुंतवणूक

गुंतवणुकीचे अनेक पर्याय (Investment Options) आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यातील खर्चानुसार बचत करणे शक्य आहे. मुलांसाठी किंवा त्यांच्या नावाने बचत सुरू करता येते.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर : मुलाच्या भविष्यातील (Children's Future Planning ) गरजा लक्षात घेऊन तुम्ही आर्थिक नियोजन सुरू करू शकता. गुंतवणुकीचे अनेक पर्याय (Investment Options) आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यातील खर्चानुसार बचत करणे शक्य आहे. मुलांसाठी किंवा त्यांच्या नावाने बचत सुरू करता येते. मुलांच्या भविष्यासाठी कोणता पर्याय निवडायचा हे तुम्ही मुलांच्या भविष्यातील गरजांनुसार ठरवू शकता. येथे आम्ही तुम्हाला अशाच 4 पर्यायांबद्दल सांगत आहोत, जिथे तुम्ही तुमच्या मुलासाठी बचत सुरू करू शकता. फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) हा गुंतवणुकीसाठी सामान्य आणि लोकप्रिय पर्याय आहे. तुम्ही मुलांच्या नावावर एफडी करू शकता. एफडीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरजेच्या वेळी त्यातून पैसे सहज काढता येतात. मुलाचे पालक किंवा कायदेशीर पालक किमान 1000 रुपयांची एफडी सुरू करू शकतात. एफडीवरील व्याजदर प्रत्येक बँकेत बदलतो. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) जर तुम्ही मुलीचे आई किंवा वडील असाल तर सुकन्या समृद्धी योजना बचतीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत, पालक किंवा कायदेशीर पालक शून्य ते 10 वर्षे वयोगटातील मुलीच्या नावावर खाते उघडू शकतात. सध्या त्यावर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजनेत 250 ते 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करता येतात. या योजनेअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत कर कपात देखील आहे. SSY अंतर्गत गुंतवणूक 15 वर्षांपर्यंत आहे. मुलगी 21 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा मुलीचे लग्न झाल्यावर ही योजना मॅच्युअर होते. गुंतवणूक केवळ 15 वर्षांसाठी असते आणि त्यावेळच्या व्याजदरानुसार 15 वर्षे ते 21 वर्षांपर्यंतच्या कालावधीत पैसे जोडत राहतात. NPS vs APY: नॅशनल पेन्शन योजना की अटल पेन्शन योजना? कोणती योजना आहे फायदेशीर? PPF इन्वेस्टमेंट मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी PPF हा एक चांगला पर्याय आहे. पालक किंवा कायदेशीर पालक मुलांच्या नावाने उघडू शकतात. PPF वर सध्याचा व्याजदर 7.1 टक्के आहे. याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. PPF खाते 500 रुपयांनी उघडता येते. 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, खाते 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये आणखी वाढवले ​​जाऊ शकते. पीपीएफमध्ये जमा केलेले पैसे, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम, तिन्ही करमुक्त आहेत. Cryptocurrency संदर्भात मोठी अपडेट, वाचा काय होणार भारतीय गुंतवणुकदारांवर परिणाम म्युच्युअर फंड (Mutual Fund) आपण आपल्या मुलासाठी म्युच्युअल फंड खरेदी करू शकता. SIP द्वारे हप्त्यांमध्येही गुंतवणूक करता येते. परंतु हे लक्षात ठेवा की म्युच्युअल फंड बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. गुंतवणूक करताना संपूर्ण माहिती गोळा करूनच पैसे गुंतवावेत. तुमच्या गरजेनुसार कोणत्या फंडात गुंतवणूक करायची ते निवडा. जर तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकत नसाल तर तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.
  First published: