मराठी बातम्या /बातम्या /मनी /

NPS vs APY: नॅशनल पेन्शन योजना की अटल पेन्शन योजना? कोणती योजना आहे फायदेशीर?

NPS vs APY: नॅशनल पेन्शन योजना की अटल पेन्शन योजना? कोणती योजना आहे फायदेशीर?

निवृत्ती नियोजनाच्या (Retirement Planning) दृष्टीने राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) या दोन पेन्शन योजनांना जास्त प्राधान्य दिले जाते. या दोन्ही सरकारी निवृत्ती वेतन योजना आहेत.

निवृत्ती नियोजनाच्या (Retirement Planning) दृष्टीने राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) या दोन पेन्शन योजनांना जास्त प्राधान्य दिले जाते. या दोन्ही सरकारी निवृत्ती वेतन योजना आहेत.

निवृत्ती नियोजनाच्या (Retirement Planning) दृष्टीने राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) या दोन पेन्शन योजनांना जास्त प्राधान्य दिले जाते. या दोन्ही सरकारी निवृत्ती वेतन योजना आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 20 नोव्हेंबर : अनेकांना सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करायची असते मात्र गुंतवणूक कुठे करावी हा त्यांच्यासमोर पडलेला प्रश्न असतो. गुंतवणुकीसाठी अनेकांना सुरक्षित पर्याय हवा असतो, म्हणून त्यांचा कल सरकारी योजनांमध्ये असते. तुम्हीही कोणत्याही सरकारी योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System) आणि अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojna) या दोन स्कीम्स बद्दल माहिती घेणार आहोत.

दोन्ही सर्वोत्तम पेन्शन योजना आहेत, मात्र दोन्हीमध्ये मोठा फरक आहे. या दोन योजनांमध्ये नेमका काय फरक आहे, पात्रता आणि फायदे काय आहेत हे पाहुया. याद्वारे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणतीही एक योजना निवडू शकता. निवृत्ती नियोजनाच्या (Retirement Planning) दृष्टीने राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) या दोन पेन्शन योजनांना जास्त प्राधान्य दिले जाते. या दोन्ही सरकारी निवृत्ती वेतन योजना आहेत.

राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे काय? (NPS)

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) 2004 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. 2009 मध्ये सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुले करण्यात आले. यामध्ये गुंतवणुकीचा काही भाग एकाच वेळी काढता येऊ शकतो आणि उर्वरित रक्कम निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी वापरू शकतो.

घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का; बिल्डर्स घरांच्या किमती वाढवण्याच्या तयारी

NPS योजनेसाठी पात्रता (Eligibility for NPS scheme)

यामध्ये 18 ते 60 वर्षांचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. तसेच अनिवासी भारतीय (NRI) देखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

NPS खात्यांचे प्रकार (Types of NPS Accounts)

NPS मध्ये दोन प्रकारची खाती आहेत, जी टियर 1 आणि टियर 2 म्हणून ओळखली जातात. टियर 1 मध्ये 60 वर्षे वयापर्यंत निधी काढता येत नाही. तर टियर 2 मध्ये, ग्राहक बचत खात्याप्रमाणे गरजेनुसार पैसे काढू शकतो.

सामान्यांना परवडणारं आहे का आजचं पेट्रोल? जाणून घ्या 1 लीटर इंधनाचे दर

अटल पेन्शन योजना काय आहे? (APY)

अटल पेन्शन योजनेत तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेंतर्गत किमान मासिक 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळू शकते. जर तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी नोंदणी करायची असेल, तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता

या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. या योजनेत किमान 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. त्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळेल. अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँकेत आधार कार्ड लिंक केलेले खाते असणे आवश्यक आहे. अटल पेन्शन योजनेंतर्गत, तुम्ही दरमहा कमी पैसे जमा करून पेन्शनचा हक्कदार होऊ शकता.

First published:

Tags: Investment, Money