आज लाँच होणार Reliance JioFiber, 'असं' करा रजिस्ट्रेशन

आज लाँच होणार Reliance JioFiber, 'असं' करा रजिस्ट्रेशन

Jio Fiber, Mukesh Ambani - आज जिओ फायबर लाँच होतंय. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 05 सप्टेंबर : रिलायन्स आज जिओ फायबर (JioFiber) लाँच करणार आहे. अगोदर याचं नाव गिगाफायबर होतं. आता जिओ फायबर झालंय. हे लाँच झाल्यानं ब्राॅडब्रँड सेवांमध्ये बराच बदल येणार आहे. रिलायन्स जिओ फायबरच्या लाँचची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीच्या एजीएममध्ये 12 ऑगस्टला केली होती.

असं करा रजिस्ट्रेशन

तुम्हाला जिओ फायबरचं कनेक्शन हवं असेल तर रजिस्ट्रेशन करावं लागेल. खाली दिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.

खूशखबर! 4 दिवसांनी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

    Loading...

  1. रिलायन्स जिओच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा.
  2.  जिओ फायबर कनेक्शनसाठी तुम्ही तुमचा पत्ता एंटर करा
  3. विचारलेल्या डिटेल्सला एंटर करा
  4. 'Generate OTP' वर क्लिक करा
  5. फोनवर मिळालेला OTP एंटर करा
  6. तुम्ही दिलेली माहिती तपासून पाहण्यासाठी रिलायन्सचा एक्झिक्युटिव्ह तुमच्या घरी येईल

बंपर धमाका! कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंत सूट

देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीच्या 42व्या वार्षिक जनरल मीटिंगमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की जिओचे 34 कोटींपेक्षा जास्त ग्राहक झालेत. सब्सक्राइबर, नफा आणि रिव्हेन्यूच्या आधारावर जिओ जगातली सर्वात मोठी टेलिकाॅम कंपनी झालीय. भारताच्या अर्थव्यवस्थेत रिलायन्सचं महत्त्वाचं योगदान आहे. 2019च्या आर्थिक वर्षात आरआयएल सर्वात नफा देणारी कंपनी ठरलीय. मुकेश अंबानी म्हणाले या वर्षात कंपनीला जास्त फायदा झालाय. मुकेश अंबानी यांनी GigaFiber सुरू करण्याची घोषणा केली. हे सेट टाॅप बाॅक्स मोफत मिळणार आहेत. ग्राहकांना 4 ते टेलिव्हिजनसह हे सेट बाॅक्स मोफत मिळतील.

नोकरी गेली तरीही काळजी करू नका, 'असा' भरा तुमचा EMI

जिओ फायबरसाठी 15 मिलियन नोंदणी झालीय. ते म्हणाले, आम्ही होम ब्राॅडबँड सर्विस, एन्टरप्राइजेस ब्राॅडब्रँड सर्विस, SME साठी ब्राॅडब्रँड सर्विस आणि इंटरनेट ऑफ थिंग्सवर फोकस करू. जिओमधल्या गुंतवणुकीचा काळ संपला. आम्ही आता जिओला नव्या उंचीवर घेऊन जाऊ.

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; CCTV VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: JIO
First Published: Sep 5, 2019 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...