खूशखबर! 4 दिवसांनी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

खूशखबर! 4 दिवसांनी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलचे दर किती कमी झालेत ते घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 05 सप्टेंबर : गेले चार दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर होत्या. राजधानी दिल्लीत पेट्रोल 6 पैसे आणि डिझेल 5 पैसे लीटर स्वस्त झालंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव सारखे कमी होतायत. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण होतेय.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथे पेट्रोलच्या किमतीत 5 पैशांनी घसरण झालीय. तर दिल्लीत हा दर 6 पैशांनी कमी झालाय. दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथे डिझेलचा दर 5 पैसे लीटर स्वस्त झालाय. कोलकातामध्ये डिझेलची किंमत 4 पैशांनी कमी झालीय.

धार्मिक आणि शिक्षण संस्थांसाठी करसवलत होणार कमी, हे आहे कारण

दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथे पेट्रोलची किंमत क्रमश: 71.95 रुपये, 77.62 रुपये आणि 74.75 रुपये प्रति लीटर आहे. डिझेल क्रमश: 65.20 रुपये, 68.36 रुपये आणि 68.89 रुपये प्रति लीटर आहे.

बंपर धमाका! कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंत सूट

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ तसंच घट पाहायला मिळते. सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

नोकरी गेली तरीही काळजी करू नका, 'असा' भरा तुमचा EMI

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

VIDEO: पावसानं घेतली उसंत! लोकल सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा

Published by: Sonali Deshpande
First published: September 5, 2019, 11:16 AM IST
Tags: petrol

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading