मुंबई, 03 सप्टेंबर : सध्या मंदी सुरू आहे. अनेकांच्या नोकऱ्या जातायत. अनेकदा गृहकर्ज घेतलेलं असतं. मग अशा वेळी काय करायचं ? गृहकर्ज कसं फेडायचं हा प्रश्न भेडसावत असतो. तेव्हा काय करावं? अनेकदा कर्ज घेताना बँकेत जो पत्ता दिला असतो, लोक तिथून बाहेर पडतात. बँकेनं त्रास देऊ नये, म्हणून अनेक जण असं करतात. तुम्ही कुठल्या कर्जावर डिफाॅल्ट केलंत तर बँक तुमचं लोन अकाउंट ताबडतोब बंद करून घरावर कब्जा करणार नाही. उलट बँक कर्ज वसुल करण्याचा प्रयत्न करेल. बँक तुमच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करेल. सोन्या-चांदीच्या दरात वाढ, ‘हे’ आहेत मंगळवारचे भाव तुमच्याकडे EMI देण्यासाठी पैसे नसतील तर पळपुटेपणा करण्यापेक्षा तुम्ही त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. अशा वेळी तुम्ही नक्कीच नवी नोकरी शोधाल. यात तुम्हाला कदाचित पहिल्याएवढा पगार मिळणार नाही. मग अशा वेळी बँकेला तुम्ही कर्ज रिस्ट्रक्चर करण्याबद्दल सांगा. शेअर बाजार आपटला, गुंतवणूकदारांचं 2.79 लाख कोटींचं नुकसान समजा 20 वर्षांसाठी तुमच्या कर्जाचं EMI 10 हजार रुपये होतं. ते आता 30 वर्षांसाठी 6 हजार रुपये करू शकता. यामुळे EMI कमी होईल. वर्ष वाढतील. कदाचित कर्जावर जास्त व्याज द्यावं लागेल. पण ओझं कमी होईल. आता विम्याची चिंता मिटली, SBI घेऊन येतेय नवी योजना याशिवाय तुम्ही बँकेला थोडा अवधी द्यायला सांगू शकता. तुमची अडचण लक्षात घेता बँक तो निर्णय घेईल. तुम्ही कर्ज न चुकवून डिफाॅल्ट करत असाल, तर बँकेबरोबरचे तुमचे संबंध बिघडतील आणि तुमचा क्रेडिट स्कोअरही कमी होईल. VIDEO : बाबा रामदेव यांच्या मेळाव्यात दुकानदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.