खुशखबर! 10 वाजता नाही, तर सकाळी या वेळेला सुरू होणार बँका

बँक ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2019 08:09 PM IST

खुशखबर! 10 वाजता नाही, तर सकाळी या वेळेला सुरू होणार बँका

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: बँक ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. सर्व साधारणपणे सरकारी सर्वजनिक बँकांच्या कामकाजाची वेळ सकाळी 10 नंतर सुरू होते. केंद्रीय अर्थ मंत्रालयातील बँक विभागाने बँकांच्या कामकाजाच्या वेळे संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील बँकाच्या कामकाजाची वेळ बदलणार आहे.

अर्थ मंत्रालयाने सर्व सरकारी बँका (PSU Banks) आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB) सकाळी 9 वाजता सुरू होतील. देशातील सर्व बँकाचे कामकाज सुरू होण्याची वेळ एक समान असावी या हेतूने अर्थ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील बैठक जून महिन्यात झाली होती. बैठकीत बँकांच्या शाखा ग्राहकांच्या सोई नुसार सुरू झाल्या पाहिजेत असे मत मांडण्यात आले होते. या संदर्भात चर्चा झाल्यानंतर कामकाजाची वेळ बदलण्यास मंजूरी देण्यात आली.

ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांसंदर्भात इंडियन बँक असोसिएशनने () एका उपसमितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने बँकांच्या शाखांच्या कामकाजाचे वेळ कसे असावे यासाठी 3 पर्याय सुचवले होते. पहिला पर्याय सकाळी 9 ते दुपारी 3 असा होता. दुसरा पर्याय सकाळी 10 ते दुपारी 4 तर तिसऱ्या पर्यायामध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 5 ही वेळ सुचवण्यात आली होती.

IBAने सर्व बँकांना सांगितले आहे की, 31 ऑगस्टपर्यंत सर्व जिल्हा स्तरीय ग्राहक समितीची बैठक आयोजित करा आणि त्याची माहिती वृत्तपत्रातून देखील द्या.

कधी लागू होणार नवी वेळ

Loading...

बँकांच्या कामकाजाची नवी वेळ ही सप्टेंबर पासून लागू होणार आहे. पण ज्या ठिकाणी बँकेच्या ग्राहकांना उशिरापर्यंत सेवा हवी असेल त्यांना सकाळीच्या ऐवजी 11पासून सेवा दिली जाईल. हा निर्णय सरकारी बँका तसेच RRB साठी लागू असेल.

VIDEO : पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले सिनेकलाकार; सुबोध, सईनं केलं 'हे' आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2019 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...