मुंबई, 12 ऑगस्ट : काल रविवारी ( 11 ऑगस्ट ) पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर सोमवारी पेट्रोलच्या दरात काही बदल झाले नाहीत. पण डिझेलची किंमत 6 पैशांनी कमी झालीय. रविवारी डिझेल 15 पैशांनी कमी झाली होती. आता दिल्लीत पेट्रोल 71.99 रुपये प्रति लीटर झालंय. तर एका डिझेलची किंमत 65.43 रुपये आहे. महानगरांमधले पेट्रोल-डिझेलचे दर मुंबईत एक लीटर पेट्रोलची किंमत 77.65 रुपये आहे. तर 1 लीटर डिझेलची किंमत 68.60 रुपये प्रति लीटर आहे. कोलकत्त्यात पेट्रोल 74.69 रुपये प्रति लीटर तर डिझेल 67.81 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल 74.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 69.13 रुपये प्रति लीटर आहे. विजयानंतरही टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, ही आहेत 3 कारणं सकाळी 6 वाजता ठरतात दर सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो. मुलाच्या अंत्यविधीसाठी आईने मागितली मदत, मृतदेहाला मुंग्या लागल्या पण… पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ? पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं. ख्रिस गेलचा डबल धमाका, ब्रायन लाराचे दोन विक्रम मोडले हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते. पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं. ग्राऊंड रिपोर्ट: पाणी ओसरल्यानंतर रस्त्यांवर चिखलामुळे दलदल, पाहा महापुराची दाहकता LIVE
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.