• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • पालघरमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडूनच Hit and Run, तीन चाकांवर गाडी चालवत उडवलं पादचाऱ्यांना

पालघरमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडूनच Hit and Run, तीन चाकांवर गाडी चालवत उडवलं पादचाऱ्यांना

पालघर (Palghar District) जिल्ह्यात Hit And Run ची घटना घडली आहे.

 • Share this:
  पालघर, 06 नोव्हेंबर: पालघर (Palghar District) जिल्ह्यात Hit And Run ची घटना घडली आहे. डहाणूमध्ये (Dahanu) भरधाव गाडीनं पादचाऱ्यांना उडवल्याची माहिती मिळतेय. धक्कादायक म्हणजे गाडी चालवणारा पोलीस अधिकारी (police officer) आहे. पोलीस अधिकाऱ्यानं चिंचणी ते डहाणू प्रवास करत असताना बाजूनं चालणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. या अपघातानंतर पोलीस अधिकारी फरार झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षकांनी दिली आहे. अपघातग्रस्त गाडी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटे यांच्या नावावर असल्याची माहिती समोर येतेय. एबीपी माझानं या संदर्भात वृत्त दिलंं आहे.  या हिट एन्ड रन प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटे यांच्या विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुहास खारमाटेंनी भरधाव गाडी चालवून अपघात केला. तारापूर ते डहाणू पोलीस ठाण्यापर्यंत त्यांनी भरधाव गाडी चालवली. यावेळी त्यांनी काही लोकांना जखमी केल्याचंही समजतंय. अपघातात जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्या व्यक्तीला नानावटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. हेही वाचा-  Terrible Accident! पहाटे पहाटे एक्स्प्रेस वेवर 30 गाड्यांचा भीषण अपघात एका बाईकस्वाराला या गाडीनं जोरदार धडक दिली. त्यानंतर गाडी चक्क तीन चाकांवर जवळपास 18 किलोमीटरपर्यंत कार भरधाव चालवली आणि डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात पार्क करण्यात आली. यानंतर पोलीस अधिकारी असलेले सुहास खारमाटे भिंतीवरुन उडी मारुन पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे. अपघात घडून आलेली गाडी डहाणू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटेंच्या नावावर आहे. या गाडीत पोलीस हॅट कॅप सुद्धा सापडली आहे. या अपघाताची दखल वाणगाव पोलीस ठाण्यानं घेतली आहे. सुहास खरमाटे फरार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या सुहास खारमाटे यांच्या विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गाडीत पोलिसांची टोपी सापडल्यानं एकच खळबळ उडाली. तसंच या अपघातानंतर डहाणू पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण देखील झालं होतं. हेही वाचा-  समोर बिबट्या दिसताच कुत्र्याला आला हृदयविकाराचा झटका; तडफडून मृत्यू, मन हेलावणारा VIDEO
   तर सदरचे पोलीस अधिकारी नशेत गाडी चालवत असल्याचं बोललं जात आहे. तर त्यांनी तीन चाकांवर गाडी चालवली असल्याचं डीव्हायएसपी यांनी सांगितलं.
  Published by:Pooja Vichare
  First published: