56 लाख रुपयांना विकलं गेलं जवळपास एक तोळं सोन्याचं नाणं; इतकं काय आहेत त्यात खास

56 लाख रुपयांना विकलं गेलं जवळपास एक तोळं सोन्याचं नाणं; इतकं काय आहेत त्यात खास

सध्या एक तोळं सोनं 50 हजारांच्याही खाली आहे. असं असताना इतक्या किंमतीला हे नाणं कसं विकलं गेलं?

  • Share this:

बंगळुरू, 02 मार्च : इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू त्या काळाची माहिती सांगत असतात. अशा वस्तूंचे मुल्य अनन्य साधारण असतं. कारण त्या वस्तू काळाच्या पडद्याआड दडलेली अनेक गुपितं खुली करतात. अशा ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करण्याचा शौक असणारे अनेक लोक असतात. अनेकदा अशा वस्तूंचे लिलाव केले जातात. या वस्तूंची किंमतही मोठी असते. जितकी जास्त दुर्मिळ वस्तू तितकी जास्त किंमत मिळते. नुकत्याच एका लिलावात मुघल साम्राज्याच्या काळातील (Mughal Empire) एका दुर्मिळ सोन्याच्या नाण्याला (Rare Gold Coin) तब्बल 56 लाख रुपये किंमत मिळाली आहे.

बंगळुरूमध्ये (Bengaluru) मरुधर आर्टसच्या (Marudhar Arts) वतीनं आयोजित दुर्मिळ वस्तूंच्या लिलावात (Auction) हे नाणं ठेवण्यात आलं होतं.

मुघल बादशहा औरंगजेब याचा (Mughal Emperor Aurangzeb)  पाचवा मुलगा मुहम्मद काम बख्श याच्या नावाच्या 10.9 ग्रॅम वजनाच्या दुर्मिळ सोन्याच्या नाण्याचा नुकताच लिलाव करण्यात आला. सुरुवातीला याची किंमत 45 ते 50 लाख रुपये ठेवण्यात आली होती. त्यावर बोली वाढत वाढत अखेर 56 लाख रुपयांना याची विक्री झाली.

हे वाचा - या टपरीवर एक कप चहासाठी मोजावे लागतात तब्बल 1000 रुपये; पाहा काय आहे खास

याबाबत अधिक माहिती देताना मरुधर आर्टसचे सीईओ राजेंद्र मारू म्हणाले की, विजापूरातील दार -उज-जाफर या टांकसाळीत तयार झालेल्या या नाण्यावर फार्सी भाषेत काही शब्द लिहिले आहेत. मात्र हे नाणं फारसं चलनात नव्हतं, त्यामुळं ते अधिक दुर्मिळ आहे.’  या नाण्याची खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव जाहीर करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

मुहमद कम बख्श अनेक लढाया लढल्या. 1707 मध्ये त्यानं विजापूरच्या किल्ल्यावर कब्जा करून स्वतःला राजा घोषित केलं होतं. हैदराबाद, गुलबर्गा (सध्याचं कलबुर्गी), शहापूर आणि विकीनखेडा जिंकण्याबरोबरच त्यानं दक्षिणेतील अनेक भाग जिंकले होते, मात्र राज्य करण्याचा फारसा अनुभव नसल्यानं अल्पावधीतच त्याचं राज्य लयाला गेलं. औरंगजेबचा मोठा मुलगा शाह आलम बहादूर (Shah Alam Bahadur) यानं जेव्हा मुघल साम्राज्याची सूत्रं हाती घेतली तेव्हा त्यानं मुहमद कम बख्शच्या स्वतःच्या नावानं नाणी बनवून घेण्यावर नाराजी व्यक्त केली होती.

हे वाचा - OMG! फक्त 10 सेकंदचा VIDEO 48 कोटी रुपयांना; इतकं काय आहे त्यात तुम्हीच पाहा

यावरून त्या दोघांमध्ये मोठी लढाई (Battel) झाली. यात मुहमद कम बख्श गंभीररीत्या जखमी झाला. त्याला पकडण्यात आलं, मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मरुधर आर्टसच्या वतीनं देण्यात आली.

Published by: Aiman Desai
First published: March 2, 2021, 10:02 PM IST
Tags: gold

ताज्या बातम्या