मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mother's Day 2021 : महिला बिझनेस लीडर्सना त्यांच्या आईने दिलेले अर्थविषयक धडे, तुमच्यासाठीही फायदेशीर

Mother's Day 2021 : महिला बिझनेस लीडर्सना त्यांच्या आईने दिलेले अर्थविषयक धडे, तुमच्यासाठीही फायदेशीर

आपल्यापैकी अनेक जण आज आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाले असतील; पण त्यापैकी बहुतेकांना अर्थसाक्षरतेचे पहिले धडे आईकडूनच मिळाले असतील.

आपल्यापैकी अनेक जण आज आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाले असतील; पण त्यापैकी बहुतेकांना अर्थसाक्षरतेचे पहिले धडे आईकडूनच मिळाले असतील.

आपल्यापैकी अनेक जण आज आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाले असतील; पण त्यापैकी बहुतेकांना अर्थसाक्षरतेचे पहिले धडे आईकडूनच मिळाले असतील.

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही दशकांमध्ये घरातल्या स्त्रिया प्रामुख्याने गृहिणी असायच्या; पण त्या पैशांचं मूल्य उत्तम रीतीने जाणत होत्या. त्यांना कदाचित गुंतवणूक, म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स यांपैकी कशाची माहिती नसेल; पण बचत, आर्थिक नियोजन आणि महागाई कशी मात करायची याचं त्यांना चांगलं आकलन होतं. आपल्यापैकी अनेक जण आज आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाले असतील; पण त्यापैकी बहुतेकांना अर्थसाक्षरतेचे पहिले धडे आईकडूनच मिळाले असतील. नऊ मे रोजी मदर्स डे (Mothers Day)आहे. त्या निमित्ताने, मनीकंट्रोल डॉट कॉमने वित्त क्षेत्रातल्या काही उच्चपदस्थ महिलांना, त्यांनी त्यांच्या आईकडून शिकलेला अर्थविषयक एक धडा सांगण्याचं आवाहन केलं. तसंच, मुलांनी त्यांच्या आईला कोणतं महत्त्वाचं अर्थविषयक गिफ्ट द्यावं असं त्यांना वाटतं, त्याबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. त्यांनी व्यक्त केलेली ही मतं. धडा पहिला : आणीबाणीच्या परिस्थितीसाठी निधी उभारून ठेवा HDFCच्या व्यवस्थापकीय संचालिका रेणू सूद कार्नाड सांगतात, की आपत्कालीन परिस्थितीसाठी निधी उभारून ठेवणं हा त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेला सर्वांत महत्त्वाचा अर्थविषयक धडा आहे.'खर्च न झालेले/केलेले पैसे म्हणजे बचत,यावर तिचा विश्वास होता. अशी रक्कम ती आपत्कालीन परिस्थितीसाठी बाजूला ठेवायची. कमी खर्चाचा पर्यायच ती निवडायची. उदाहरण सांगायचं तर विमान प्रवासापेक्षा ती रेल्वे प्रवासाला प्राधान्य द्यायची. तिच्यामुळेच मला आपत्कालीन निधीचं महत्त्व कळलं आणि मीही तसं करायला शिकले,'असं कार्नाडसांगतात. हे ही वाचा-दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार नाही; केंद्र सरकारचा दावा सध्याच्या काळात अनेक आर्थिक सल्लागार आपत्कालीन निधी(Emergency Fund Corpus)उभारण्याचा सल्ला देतात. सध्याच्या कोरोना काळात त्याचं महत्त्व कळतं. तुम्हीही आपत्कालीन निधी राखून ठेवत असाल, तर उत्तमच; पण नसेल तर आत्ताच सुरुवात करा. धडा दुसरा : बजेट करा (Budgeting)आणि खर्च विचारपूर्वक करा. घरातल्या मासिक खर्चांचं नियोजन आणि केलेल्या खर्चांचं विश्लेषण हे आईचं महत्त्वाचं काम असतं.'शेरोज मनी'च्या सहसंस्थापिका सिद्धिका अगरवाल यांनी त्यांच्या आईच्या खर्चाची डायरी लिहायच्या सवयीबद्दल सांगितलं. त्या डायरीत त्या महिन्याचं किराणा सामान, बिल्स आदींच्या खर्चाची नोंद करून ठेवायच्या. त्यामुळे सिद्धिका यांना हा महत्त्वाचा धडा लहानपणीच मिळाला. त्या म्हणतात, 'मी कमावती झाल्यावरही मी या बाबतीत निष्काळजीच होते; पण क्रेडिट कार्डचं बिल जेव्हा माझ्याकडून पहिल्यांदा चुकवलं गेलं, तेव्हा मला माझ्या आईच्या सवयीचं महत्त्व कळलं. आता मी डायरी (Diary) मेन्टेन करत नाही; पण वेगवेगळ्या अॅप्सच्या साह्याने माझ्या खर्चांवर लक्ष ठेवते आणि बचत करते.' कोटकमहिंद्रा AMC मध्ये चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर असलेल्या लक्ष्मी अय्यर सांगतात, की आपल्या कुवतीपेक्षा जास्त खर्च न करण्याचा सल्ला आई त्यांना द्यायची. आईच्या त्या सल्ल्याचा आपल्या खर्चाच्या सवयीवर आणि गुंतवणुकीच्या निर्णयांवर मोठा प्रभाव असल्याचं त्या म्हणतात. हे ही वाचा-SBIच्या 44 कोटी ग्राहकांना मोठा दिलासा; एका कॉलवरच होतील महत्त्वाची कामं धडा तिसरा : आर्थिक उद्दिष्टं ठरवा (Financial Goals)आणि ती साध्य करण्यासाठी गुंतवणूक करा. गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याबद्दल (Returns)आपल्या आईच्या काळात विचार केला जात नसला,तरी आपण बचत का केली पाहिजे, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. साध्या शब्दांत त्याला आर्थिक उद्दिष्ट म्हणता येईल. कार्नाड सांगतात, 'गृहकर्जाच्या साह्याने घर घ्यायचं असं तुमचं नियोजन असेल,तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला किती रक्कम उभारावी लागेल, हे पाहून त्यासाठीचं नियोजन करावं लागेल. त्यानंतर बाकीची रक्कम होम लोनच्या माध्यमातून उभी करावी.' आजच्या काळात म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅननुसार (SIP)गुंतवणूक केल्यास पाच ते दहा वर्षांत तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करतायेतं. अय्यर सांगतात, की'नंतर एखादी मोठी वस्तू घ्यायची असेल,तर माझी आई फिस्क्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची. त्यातून मला संयम शिकता आला. त्यामुळे मार्केट व्होलॅटिलिटीचाही कमीत कमी प्रभाव होऊन गुंतवणूक करता येईल, हे शिकता आलं.' वित्त क्षेत्रातल्या या उच्चपदस्थ महिलांनी त्यांच्या आईला कोणते अर्थविषयक धडे दिले? धडा पहिला : गुंतवणुकीत वैविध्य (Diversity in Investment) कार्नाडयांच्या आईप्रमाणे अनेकींना पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये किंवा बचत खात्यातठेवण्याची सवय असते.'तिला त्यातून फारसा परतावा मिळत नव्हता. म्हणून मी तिला गुंतवणुकीच्या उपलब्ध पर्यायांची माहिती दिली. तसंच गुंतवणुकीत वैविध्य ठेवण्याचे फायदे सांगितले. सरकारी गुंतवणूक योजना, म्युच्युअल फंड्स आदींचे फायदे सांगितले. आता तिने गुंतवणुकीत वैविध्य आणण्याचं मान्य केलं आहे.' धडा दुसरा : डिजिटल गोल्ड स्कीम्समध्ये (Digital Gold Scheme)गुंतवणूक अनेक महिलांना सोन्याची नाणी, ज्वेलरी आदींमध्ये गुंतवणूक करण्याची सवय असते.अनेक वर्षं त्यात गुंतवणूक केल्यावर चांगले पैसे मिळतील,असा त्यांचा होरा असतो.'खरं तर सोन्याचे दागिने गुंतवणूक म्हणून विकत घेताना 15 ते 20 टक्के रक्कम घडणावळ म्हणून दिली जायची. त्यामुळे त्यातून भविष्यात जास्त परतावा मिळण्यापेक्षा किमतीत घटच जास्त यायची. म्हणून मी आईला सांगितलं,की दागिनेघालायचे असतील, तर घे, गुंतवणूक म्हणून घेऊ नकोस. सोव्हेरिन गोल्ड बाँडची माहिती मी तिला दिली. त्यामुळे तिला त्यातून काही तरी परतावा मिळतो,'असंअगरवाल यांनी सांगितलं. अय्यर यांनीही त्यांच्या आईला डिजिटल गोल्डस्कीमबद्दल सांगितलं. कारण त्यात बँकेच्या लॉकरप्रमाणे कोणतीही स्टोरेजकॉस्ट अंतर्भूत नसते. आईला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची भेट ज्येष्ठ व्यक्तींना वैद्यकीय मदतीची गरज अनेकदा भासते. सध्याच्या महामारीच्या (Pandemic)काळात तर तिचं महत्त्व खूपच आहे. 'माझी आई कुटुंबातल्या सगळ्यांची काळजी घेते. कुटुंबाला एकत्र ठेवते. तिच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स निवडणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं.2019 मध्ये मीतिचा पाच लाखांचा आरोग्य विमा काढला होता. आता ती 20 लाखांवर नेली. गेल्यावर्षी कोविडमुळे ती हॉस्पिटलाइज्ड होती, तेव्हा त्याचा उपयोग झाला,'असं अगरवाल यांनी सांगितलं. कार्नाड यांनीही आपण कमावत्या झाल्यावर आईसाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी (Health Insurance Policy)घेतल्याचं सांगितलं. या पॉलिसीमुळे बचतीवर विपरीत परिणाम न होता उत्तम वैद्यकीयसुविधा मिळू शकतात,असं त्या सांगतात.
First published:

Tags: Economy, Finance, Financial benefits, Women

पुढील बातम्या