मुंबई, 5 मार्च : अमूलनंतर (Amul) आता मदर डेअरी (Mother Dairy) या दूध कंपनीनेही दुधाचे दर वाढवले आहेत. मदर डेअरीने दुधाच्या विविध प्रकारांमध्ये 2 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. आता मदर डेअरीचे दूध खरेदी करताना ग्राहकांना दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. नवीन दर 6 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत. मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. दिल्ली-एनसीआरमधील सर्वात मोठी दूध पुरवठादार मदर डेअरीने सांगितले की, किमतीत वाढ झाल्यामुळे दुधाचे दर वाढवले जात आहेत. अमूलने दरवाढ केल्यानंतर काही दिवसांनी मदर डेअरीने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, अमूलने 1 मार्च 2022 पासून देशभरात दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. Russia-Ukraine युद्धाने शेअर बाजाराला हादरे, बाजार 12 सेशनमध्ये 4000 अंकांनी खाली मदर डेअरीच्या दुधाच्या किमतीत वाढ केल्यानंतर 6 मार्चपासून मदर डेअरी टोन्ड मिल्कचा दर 49 रुपये झाला आहे जो 47 रुपये प्रतिलिटर होता. आता डबल टोन्ड दुधाची किंमत 41 रुपयांवरून 43 रुपये प्रति लिटर होणार आहे. मदर डेअरी फुल क्रीम दुधाची किंमत 57 रुपयांवरून 59 रुपये प्रति लिटर होणार आहे. त्याचप्रमाणे मदर डेअरी बूथवर उपलब्ध असलेल्या टोन्ड दुधाची किंमत 44 रुपयांऐवजी 46 रुपये प्रतिलिटर असेल. त्याचबरोबर मदर डेअरीच्या गायीच्या दुधाची किंमत 49 रुपयांवरून 51 रुपयांपर्यंत वाढणार आहे. Home Loan ट्रान्सफर करुन EMI 5000 रुपयांनी कमी करा, संपूर्ण कॅलक्युलेशन समजून घ्या अमूल दूधाची किंमत ताज्या दरांनुसार, 1 मार्चपासून गुजरातमधील अहमदाबाद आणि सौराष्ट्र बाजारपेठेत अमूल गोल्ड (Amul Gold) 30 रुपये प्रति 500 मिली, अमूल ताझा (Amul Taza) 24 रुपये प्रति 500 मिली आणि अमूल शक्ती (Amul Shakti) 27 रुपये प्रति 500 मिली असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.