मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Moneycontrol 'नंबर वन', देशात फायनान्ससंबंधी बातम्या देणारा पहिल्या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म

Moneycontrol 'नंबर वन', देशात फायनान्ससंबंधी बातम्या देणारा पहिल्या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म

वाचकांसाठी मार्केट (Market) आणि बिझनेसच्या (Business) स्थितीबाबत स्पष्टता आणि अद्ययावत माहिती देण्याचं काम मनीकंट्रोल उत्कृष्टपणे करत आहे.

वाचकांसाठी मार्केट (Market) आणि बिझनेसच्या (Business) स्थितीबाबत स्पष्टता आणि अद्ययावत माहिती देण्याचं काम मनीकंट्रोल उत्कृष्टपणे करत आहे.

वाचकांसाठी मार्केट (Market) आणि बिझनेसच्या (Business) स्थितीबाबत स्पष्टता आणि अद्ययावत माहिती देण्याचं काम मनीकंट्रोल उत्कृष्टपणे करत आहे.

नवी दिल्ली, 29 मार्च : सामान्य नागरिकांना इतर दैनंदिन घडामोडींसोबतच आर्थिक घडामोडी जाणून घेण्याचीही उत्सुकता असते. यासाठी ते फायनान्ससंबंधी बातम्या देणारे न्यूज पेपर, वेबसाईट्स आणि पोर्टल्सवरील बातम्या वाचतात. 'मनीकंट्रोल' (Moneycontrol) ही वेबसाईट, भारतातील प्रथम क्रमांकाची फायनान्ससंबंधी बातम्या (Financial News) देणारा प्लॅटफॉर्म ठरली आहे. वाचकांसाठी मार्केट (Market) आणि बिझनेसच्या (Business) स्थितीबाबत स्पष्टता आणि अद्ययावत माहिती देण्याचं काम मनीकंट्रोल उत्कृष्टपणे करत आहे. द इकॉनॉमिक टाइम्स वेबसाईटला (The Economic Times) मात देऊन मनीकंट्रोलनं हा मान मिळवला आहे. कॉमस्कोअर मल्टीप्लॅटफॉर्मनं (इंडिया) (ComScore Multiplatform) फेब्रुवारी 2022 मध्ये दिलेल्या रिपोर्टनुसार, मनीकंट्रोलनं द इकॉनॉमिक टाइम्सला सर्व ट्रॅफिक पॅरामीटर्समध्ये मागे टाकलं आहे. मनीकंट्रोल या भारतातील अग्रगण्य फायनॅन्शियल न्यूज प्लॅटफॉर्मला व्हिजिट (Visitors) देणाऱ्यांच्या संख्येमध्ये दर महिन्याला लक्षणीय आणि स्थिर वाढ झाली आहे. इतकंच नाही तर वेबसाईटवर बातम्या वाचण्यासाठी थांबणाऱ्या युजर्सच्या सरासरी वेळेतही सातत्यानं वाढ होत आहे. कॉमस्कोअरनं दिलेल्या डेटानुसार, मनीकंट्रोलनं देशातील सर्वात विश्वासार्ह आर्थिक बातम्यांचं व्यासपीठ म्हणून आपलं स्थान मजबूत करताना युनिक व्हिजिटर्स (UVs), अॅव्हरेज टाईम स्पेंड (Average Time Spent) आणि इतर प्रमुख ट्रॅफिक पॅरामीटर्समध्ये द इकॉनॉमिक टाइम्सला मागे टाकलं आहे. मनीकंट्रोलच्या युनिक व्हिजिटर्सची संख्या 42.39 दशलक्ष इतकी आहे त्या तुलनेत 41.65 दशलक्ष युनिक व्हिजिटर्ससह इकॉनॉमिक टाइम्स मागं पडलं आहे. मनीकंट्रोलकडे सध्या एकूण 378 दशलक्ष व्ह्युज आहेत तर इकॉनॉमिक टाइम्सकडे 192 दशलक्ष व्हुज आहेत. म्हणजेच टाइम्सपेक्षा मनीकंट्रोलकडे 97 टक्के अधिक व्हुज आहेत. याशिवाय, कॉमस्कोअरमधील आकडेवारीनुसार, युजर्सनी मनीकंट्रोलवरील वार्तांकन वाचण्यासाठी एक हजार 382 मिनिटांचा वेळ खर्च केला आहे. तर, टाइम्सवर केवळ 322 मिनिटंच युजर्स थांबू शकले आहेत. मनीकंट्रोलचा अॅव्हरेज टाईम स्पेंड 329 टक्क्यांनी अधिक आहे. मनीकंट्रोलच्या पेजवर प्रत्येक व्हिजिटर सरासरी 32.6 मिनिटं स्पेंड करतो तर इकॉनॉमिक टाइम्स वेबसाईटवर एक व्हिजिटर फक्त 7.7 मिनिटं थांबतो. या प्रमाणामध्ये 323 टक्क्यांची तफावत आहे. या आकडेवारीकडे पाहून मनीकंट्रोलवर प्रेक्षकांचा (Audience) जास्त विश्वास असल्याचं सिद्ध होतं. व्हॅल्युएबल मार्केट आणि बिझनेस रिलेटेड बातम्यांमध्ये स्वारस्य असलेल्या वाचकांसाठी मनीकंट्रोल ब्रेकिंग न्यूज, डीप अॅनॅलिसिस (Deep Analysis) आणि शार्प कॉमेंट्री पुरवण्याचं काम करत आहे. त्यामुळे सध्याच्या सदोष वार्तांकन आणि असत्य माहिती कथन सुरू असलेल्या काळातही विश्वासार्ह आणि योग्य बातम्या देणाऱ्या मनीकंट्रोलकडे वळणाऱ्या वाचकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे आणि हा डेटा त्याची साक्ष देत आहे.

हे वाचा - Bank Strike : SBI, PNB सह अनेक बँकांचा दोन दिवसीय संप, काय आहे कारण

ब्लॉग, व्हिडिओ, पॉडकास्ट आणि विशिष्ट विषयांसंबधी मत पक्कं करण्यास मदत करणारी आर्टिकल्स या डिजिटल जर्नलिझममधील (Digital Journalism) प्रकारांच्या सहाय्यानं मनीकंट्रोल विश्वासार्ह आणि सुयोग्य पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहे. मनीकंट्रोलनं फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी (Budget Day) पुन्हा सर्व डिजिटल ट्रॅफिकचे रेकॉर्ड तोडले होतं. कारण, भारतभरातील लाखो लोकांनी अपडेटेड माहितीसाठी खास डिझाईन केलेल्या या मायक्रोसाइटला (Microsite) भेट दिली होती. मनीकंट्रोलने वार्तांकनातून दिलेले केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतचे रिअल-टाईम अपडेट्स, सखोल विश्लेषण यामुळे वाचक आणि प्रायोजक दोघांनीही मनीकंट्रोलवर विश्वास दाखवला आणि वेबसाईटच्या सर्वाधिक एंगेजमेंटच्या आकडेवारीने ते सिद्ध झालं आहे. मनीकंट्रोलवर विश्वास दाखवल्याबद्दल संपूर्ण स्टाफनं वाचकांचे आभार मानले आहेत.
First published:

Tags: Finance, Financial benefits, Share market

पुढील बातम्या