नवी दिल्ली, 29 मार्च : भारतभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपाला (Nationwide Bank Strike) सोमवार 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजता सुरुवात झाली. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), बँक एम्प्लॉईज असोसिएशन (BEFI) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) यासह अनेक बँक संघटनांनी सोमवार आणि मंगळवारच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. या दोन्ही दिवशी कर्मचारी संपावर जाणार असल्याचं युनियननं सांगितलं आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्रातील मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या संपात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, असं युनियनने सांगितलं. सरकारने बँकांचे खासगीकरण थांबवावे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बळकट करण्यासाठी पावले उचलावीत, अशी बँक संघटनांची मागणी असल्याचं युनियनने म्हटलं आहे.
खासगीकरणाची मागणी -
भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एका निवेदनात म्हटलं आहे की, संपामुळे त्यांच्या बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आम्ही बँकेने संपाच्या दिवसांमध्ये आपल्या शाखा आणि कार्यालयांचे कामकाज सामान्यपणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. असं असतानाही संपामुळे आमच्या बँकेतील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे, असं SBI ने सांगितलं.
प्रमुख बँकांचं काम प्रभावित -
एसबीआयप्रमाणे, दुसरी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, पंजाब नॅशनल बँकेने (PNB) सांगितलं की, आज भारत बंददरम्यान त्यांच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. PNB ने पुढे म्हटलंय, “बँकेने आपल्या शाखा आणि कार्यालयांचं कामकाज सामान्यपणे चालावं, यासाठी सर्व व्यवस्था केली आहे. मात्र तरीदेखील संपामुळे आमच्या बँकेतील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.”
अनेक दिवसांपासून बँकांच्या कामावर परिणाम -
सुरुवातीला साप्ताहिक सुट्टीमुळे (Weekend) बँका 2 दिवस बंद होत्या. या संपामुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. 26 मार्च महिन्याचा चौथा शनिवार होता, तर 27 मार्चला रविवार होता. त्यामुळे सलग 2 दिवस बँका आधीच बंद होत्या. आता संपामुळे सोमवार 28 मार्च आणि मंगळवारी 29 मार्च बँका बंद राहणार आहेत. अशाप्रकारे सलग 4 दिवस देशातील बँकिंग कामकाज ठप्प होणार आहे. सलग चार दिवस बँका बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसणार आहे.
बँकांनी जरी म्हटलं असलं की त्यांनी पर्यायी व्यवस्था करून ठेवली आहे, तरी बँकांमधील कर्मचारीच जर संपात सहभागी होणार असतील, तर ते काम प्रभवित होणारच. त्यामुळे नागरिकांनी बँकांचे कामकाज असल्यास संबंधित शाखेत कर्मचारी आहेत की नाही याची खात्री करून घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank strike, Pnb bank, SBI