मुंबई, 5 जून : गेल्या काही वर्षांत देशात डिजिटलायझेशन (Digital Transaction) खूप वेगाने वाढले आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक इत्यादींचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करु लागले आहेत. डिजिटलायझेशनच्या वाढत्या प्रभावामुळे सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Crime) घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारही लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरत आहेत. आता RBI च्या नावाने लोकांची फसवणूक होत असल्याचं समोर येत आहे. अशा परिस्थितीत, लोकांना या गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी, PIB व्हायरल मेसेजची सत्यता तपासते. सध्या RBI शी संबंधित अनेक व्हायरल मेसेज लोकांना येत आहेत. अनेक वेळा लोकांना RBI चे मेसेज येतात यामध्ये लॉटरी किंवा विविध योजनांची माहिती देण्यात येते. मात्र हा मेसेज खरा आहे की खोटा हे शोधणे फार गरजेचे आहे. व्हायरल झालेल्या मेसेजचे सत्य पीआयबी फॅक्ट चेकने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाने पाठवलेला मेसेज फॅक्ट चेक केला आहे. पीआयबीने ट्वीट करून म्हटले आहे की, ‘आरबीआयच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहा! फसवणूक करण्याच्या उद्देशाने गुन्हेगार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाने ईमेल, पत्र आणि एसएमएस पाठवत आहेत किंवा बँकेचे अधिकारी असल्याचा दावा करत आहेत. Investment Tips: FD चे केवळ फायदे नाही तोटे देखील आहेत; समजून घ्या मग गुंतवणूक करा
.@RBI के नाम पर हो रही ठगी से रहें सावधान‼️
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 3, 2022
ठगी के उद्देश्य से धोखेबाज़ों द्वारा भारतीय रिज़र्व बैंक के नाम से या बैंक के अधिकारी होने का दावा करते हुए ईमेल/ पत्र/एसएमएस भेजे जा रहे हैं
✅ देखें यह #PIBFacTree और खुद को ऐसी धोखाधड़ी से सुरक्षित रखें
#PIBFactcheck pic.twitter.com/2LYUe92kqO
Real Estate Investment: प्रॉपर्टी खरेदी न करताही कमावा नियमित भाडे, कसं? आरबीआयच्या नावाने फसवणूक गेल्या काही काळापासून सायबर गुन्हे करणारे लोक आरबीआयच्या नावाने बनावट ईमेल, लेटर्स आणि मेसेज पाठवत आहेत. यासोबतच RBI लोकांशी संपर्क करून वैयक्तिक माहिती विचारत नाही हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. आरबीआय लॉटरी फंडांच्या बक्षिसांची माहिती देणारा कोणताही ईमेल पाठवत नाही आणि आरबीआयकडून अद्याप पेमेंटचे कोणतेही नोटिफिकेशन लेटर जारी करण्यात आलेले नाही.