नवी दिल्ली, 15 जून : गुंतवणूक करण्यावर लोकांचा भर वाढला आहे. अशा वेळी छोट्या बचत योजनांबद्दल बोलायचे झाले तर पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF) हे असं अकाउंट आहे ज्यावर अनेक फायदे मिळतात. पीपीएफ अकाउंट हे लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी गॅरंटीड रिटर्न देणारे प्रोडक्ट आहे. यामध्ये तुमच्या पैशाला पाउंडिंगची जबरदस्त शक्ती मिळते. यासोबतच गुंतवणुकीपासून ते मॅच्योरिटी अमाउंट आणि व्याजाची रक्कम देखील टॅक्स फ्री असते. म्हणजेच टॅक्स सेव्हिंगच्या दृष्टीनेही हा एक बेस्ट ऑप्शन आहे. PPF अकाउंट तुमच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस ब्रांचमध्ये फक्त 500 रुपयांमध्ये उघडता येते. या अकाउंटचा एक फायदा म्हणजे तुम्ही गरजेनुसार स्वस्त आणि सुलभ कर्ज देखील घेऊ शकता.
फॉर्म डी म्हणजे काय? अकाउंट ओपन केल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पीपीएफ अकाउंटवर कर्ज मिळू शकतं. उदाहरणार्थ, तुम्ही आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये अकाउंट उघडले असेल, तर तुम्ही 2023-24 मध्ये कर्जासाठी अप्लाय करू शकता. अकाउंटचे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आंशिक पैसे काढता येतात. पीपीएफ खात्यावर कर्ज घेण्यासाठी अकाउंट होल्डरला फॉर्म डी भरणे आणि सबमिट करणे आवश्यक आहे. त्यात अकाउंट नंबर, कर्जाची रक्कम आणि अकाउंट होल्डरची स्वाक्षरी असावी. यासोबतच पीपीएफ अकाउंटचं पासबुकही जोडावं लागेल. यानंतर, ज्या बँकेत/पोस्ट ऑफिस ब्रांचमध्ये तुमचं पीपीएफ अकाउंट असेल, ते तेथे जमा करावे लागेल.
PPF Rules: मॅच्युरिटीपूर्वीच PPF अकाउंट होल्डरचा मृत्यू झाला तर काय? पैसे क्लेम कसे करायचे?किती कर्ज मिळू शकते नियमांनुसार, तुम्ही तुमच्या दुसऱ्या वर्षाच्या शेवटी तुमच्या PPF अकाउंटमध्ये जेवढं बॅलेन्स आहे त्या रकमेच्या 25% पर्यंत कर्ज मिळवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कर्जासाठी अर्ज केला असेल तर 31 मार्च 2021 पर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलेन्सच्या 25 टक्के पर्यंत कर्ज मिळू शकते.
पीपीएफ अकाउंटवर घेतलेल्या कर्जाची रक्कम व्याजासह एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते. या लोनवर वार्षिक 1% व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल. हे शॉर्ट टर्म लोन आहे. हे लोन 36 महिने पूर्ण होण्यापूर्वी फेडावे लागेल. तुम्ही 36 महिन्यांनंतर परतफेड केल्यास, कर्ज वाटपाच्या तारखेपासून वार्षिक 6% व्याज भरावे लागेल.
PF मधून पैसे काढाल तर भरावा लागणार TAX? नेमका काय बदलला नियम पाहा PHOTOपीपीएफ अकाउंट होल्डर एका वर्षात फक्त एका लोनसाठी अप्लाय करू शकतात. पुन्हा पीपीएफ अकाउंटवरील कर्जासाठी आधी जुने कर्ज फेडले पाहिजे. जर तुम्ही कर्जाची परतफेड केली नसेल तर तुम्हाला नवीन कर्ज मिळू शकणार नाही. तुमचे पीपीएफ अकाउंट अॅक्टिव्ह नसेल तर तुम्ही त्यावर लोन घेऊ शकत नाही. दुसरीकडे, अल्पवयीन किंवा मतिमंद व्यक्तीच्या नावाने अकाउंट उघडले असल्यास, पालक त्याच्या वतीने कर्जासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी त्यांच्या वतीने अकाउंट्स ऑफिसमध्ये सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे.