जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Supertech's chairman R K Arora : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची सर्वात मोठी कारवाई, सुपरटेकचे चेअरमन अटकेत

Supertech's chairman R K Arora : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची सर्वात मोठी कारवाई, सुपरटेकचे चेअरमन अटकेत

ईडीची सर्वात मोठी कारवाई

ईडीची सर्वात मोठी कारवाई

Supertech’s chairman R K Arora : ट्वीन टॉवर तयार करणाऱ्या सुपरटेकचे चेअरमन अरोरा यांच्यावर मोठी कारवाई, ग्राहकांची केली फसवणूक केल्याचा आरोप

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

नवी दिल्ली : देशभरात गेल्या वर्षापासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जोरदार कारवाई ED कडून सुरू आहे. याच संदर्भात आता सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. सुपरटेकचे चेअरमन आर के अरोरा यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ED ने आर के अरोरा यांना अटक केली आहे. त्या घटनेमुळे सध्या सर्वात मोठी खळबळ उडाली आहे. ED ने सुपरटेकचे मालक आणि चेअरमन आर के अरोरा यांना अटक केली. हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याचे सांगण्यात आलं आहे. नोएडा येथील सुपरटेकचे ट्विन टॉवर्स गेल्या वर्षीच पाडण्यात आला होता. मंगळवारी त्यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यांच्यावर पीएमएलएच्या फौजदारी कलमांतर्गत बेड्या ठोकण्यात आल्या.

Mamata banerjee : ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने जात असताना अचानक सुरू झाला पाऊस; मोठा अनर्थ टळला

दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील पोलिस विभागांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरमधून सुपरटेक समूह, त्याचे चेअरमन अरोरा यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण समोर आले आहे. एफआयआरमध्ये त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ग्राहकांकडून पैसे तर घेतले मात्र ग्राहकांना राहण्यासाठी घराचं पजेझन देण्यात आलं नाही. ईडीने एप्रिल महिन्यात रिअल इस्टेट ग्रूप आणि त्याच्याशी संबंधितांची 40 कोटींचा संपत्ती जप्त केली होती. आता त्यांनी तीन चौकशीच्या फेऱ्याअंती अरोरा यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. गेल्यावर्षी न्यायालयाच्या आदेशानंतर ट्विन टॉवर पाडण्यात आला. साधारण 3,000 किलोग्राम विस्फोटकांचा वापर करुन ही इमारत पाडण्यात आली होती. याची चर्चा देखील खूप रंगली होती.

विमानापेक्षा महाग तिकीट, सर्वात कमी स्पीड! मुंबई-गोवा वंदे भारतच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत?
News18लोकमत
News18लोकमत

19 एप्रिल रोजी सुपरटेक कार्यालयावर मोठी कारवाई करण्यात आली. गौतम बुद्ध नगर जिल्हा प्रशासनाने सेक्टर 96 मधील सुपरटेक कार्यालयाचे मुख्य कार्यालय सील केले. प्रत्यक्षात, सुपरटेक टाऊनशिप प्रोजेक्ट लिमिट्यूवर RERA कडे 33 कोटी 56 लाख रुपये थकीत होते. या संदर्भात सुपरटेकला अनेकवेळा नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या मात्र बिल्डरने गांभीर्याने घेतले नाही. मुनाडी करूनही बिल्डरने रक्कम जमा न केल्याने जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात