जाहिरात
मराठी बातम्या / देश / Mamata banerjee : ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने जात असताना अचानक सुरू झाला पाऊस; मोठा अनर्थ टळला

Mamata banerjee : ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने जात असताना अचानक सुरू झाला पाऊस; मोठा अनर्थ टळला

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

Mamata banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरला खराब हवामानामुळे मंगळवारी दुपारी सिलीगुडीजवळील सेवोके विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

  • -MIN READ Kolkata,West Bengal
  • Last Updated :

सिलीगुडी, 27 जून : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला. मंगळवारी खराब हवामानामुळे सिलिगुडीजवळील सेवोक एअरबेसवर हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बॅनर्जी जलपाईगुडी येथे निवडणूक रॅलीला संबोधित केल्यानंतर बागडोगरा विमानतळावर जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर बैकुंठपूरच्या जंगलातून उडत असताना खराब हवामानाच्या भागात पोहोचले. एका अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला सांगितले की, ‘येथे खूप पाऊस पडत असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पायलटने आपत्कालीन परिस्थितीत हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेतला.’ ते म्हणाले की, या घडामोडीनंतर बॅनर्जी बागडोगरा विमानतळापर्यंत रस्त्याने प्रवास करतील आणि तेथून कोलकात्याला विमानाने जातील असे ठरले आहे. पंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्री बॅनर्जी राज्याच्या उत्तर भागातील अनेक भागांचा दौरा करत आहेत. राज्यातील पंचायत निवडणुकीसाठी 8 जुलै रोजी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका होणार आहेत, ज्यासाठी ममता बॅनर्जी रॅली काढत आहेत. या पंचायत निवडणुकीत मारहाण आणि हाणामारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वाचा - उद्धव ठाकरे, राऊतांच्या अडचणीत वाढ; न्यायालयानं बजावलं समन्स आज सकाळी कूचबिहार जिल्ह्यात टीएमसीच्या दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यादरम्यान गोळीबारही झाला, ज्यात पाच जण जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाला. याआधी सोमवारी मुर्शिदाबादमध्येही टीएमसी आणि सीपीआय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. यादरम्यान बॉम्बस्फोट झाल्याची घटनाही समोर आली आहे. पंचायत निवडणुकीतील गदारोळ पाहता विरोधकांनी पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय दल तैनात करण्याची मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात