• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • वार्षिक 12 रुपये प्रीमियमवर मिळवा 2 लाखांचा विमा; जाणून घ्या काय आहे योजना

वार्षिक 12 रुपये प्रीमियमवर मिळवा 2 लाखांचा विमा; जाणून घ्या काय आहे योजना

देशातील सामान्य नागरिकाला विमा सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीं सरकारने काही वर्षांपूर्वी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू केली.

  • Share this:
मुंबई, 14 जुलै- कोरोनाच्या महामारीच्या (Covid-19) काळात आयुष्याचे अनेक आयामच बदलले आहेत. त्यामुळे अगदी पैसेवाल्या लोकांनाही त्यांच्या खर्चांचा फेरविचार करावा लागत आहे. प्रत्येकच जण बचतीला प्राधान्य देत आहे. त्यामुळे वायफळ खर्च टाळण्याकडे कल वाढतो आहे. गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करणं, महागड्या वस्तू खरेदी करणं हे ट्रेंड (Trend) कमी होताना दिसत आहेत. ही जशी आर्थिक बाजू झाली तशीच आरोग्याची बाजूही आहेच. याकडेही सामान्य नागरिक लक्ष देत आहे. वैद्यकीय इमर्जन्सी टाळण्यासाठी आहारात बदल, व्यायाम करणं या गोष्टी सुरू झाल्या आहेत. तसंच जर तशी इमर्जन्सी आलीच तर विमा संरक्षण असावं असा विचार अनेक जण करत आहेत. तुम्हीही जर असा विचार करत असाल तर तुम्हाला मदत करणारी केंद्र सरकारची अपघात विमा योजना आहे ज्यात तुम्ही महिन्याला केवळ 1 रुपया म्हणजे वर्षाला 12 रुपये भरून 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळवून शकता. या योजनेचं नाव आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana-PMSBY). या योजनेअंतर्गत तुम्हाला केवळ वार्षिक 12 रुपयांच्या प्रीमियमवर (Yearly Premium) 2 लाख रुपयांचा विमा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सगळं काही. मे महिन्याच्या शेवटी खात्यातून जातो प्रीमियम देशातील सामान्य नागरिकाला विमा सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीं सरकारने काही वर्षांपूर्वी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू केली. अगदी सामान्यातल्या सामान्य नागरिकाला ही विमा योजना घेता यावी म्हणून तिचा प्रीमियम (Premium) अगदी कमी म्हणजे महिन्याला 1 रुपया ठेवला. म्हणजे वर्षाला केवळ 12 रुपये या योजनेत गुंतवले तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे तुमचा अपघात झाला तर तुम्हाला 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळतं. दरवर्षी आपण जोडलेल्या बँक खात्यातून 31 मे या तारखेला (On 31st May every year) हा वार्षिक 12 रुपयांचा हप्ता कापला जातो. त्यामुळे तुम्ही आवर्जून बघत जा की खात्यातून आपला हप्ता कापला गेला आहे की नाही. (हे वाचा:10 लाख मिळवण्याची संधी, जाणून घ्या LIC ची नवी पॉलिसी  ) या योजनेतील अटी कोणत्या? या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचं वय 18 ते 70 दरम्यान असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळी पॉलिसी विकत घेता तेव्हा तुमचं बँक खातं या योजनेशी जोडलं जातं. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात तुमच्या खात्यातून प्रीमियमचा हप्ता (Instalment) आपोआप कापला जातो. या योजनेत गुंतवणूक केलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यु झाला तर त्याच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये दिले जातात अन्यथा जर ती व्यक्ती अपंग झाली तर त्याला ही रक्कम मिळते. (हे वाचा: SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाचे, या LINK वर क्लिक करण्यापूर्वी सावधान!) कसं कराल रजिस्ट्रेशन? कोणत्याही सरकारी बँकेच्या कोणत्याही खात्यात जाऊन तुम्ही या विमा योजनेसाठी अर्ज करू शकता. बँक मित्र पण या योजनेची माहिती घरोघरी जाऊन देत आहेत. ही विमा योजना खरेदी करण्यासाठी तुम्ही विमा एजंटशीही संपर्क करू शकता. सरकारी तसंच खासगी विमा कंपन्यापण ही योजना विकतात. त्यामुळे जर तुम्हाला पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत गुंतवणूक करायची असेल तर लगेच जवळच्या बँकेत किंवा विमा एजंटला संपर्क करा.
First published: