मुंबई, 24 जून : तुम्हाला नोकरीऐवजी व्यवसाय सुरू करायचाय? तर मग ही एक चांगली संधी आहे. मोदी सरकारच्या या योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता. या योजनेअंतर्गत 2020पर्यंत देशात 2600 जन औषधी केंद्र सुरू करायची आहेत. मोदी सरकार स्वस्त औषधं मिळतील अशी केंद्र सुरू करतंय. लोकांना चांगली आणि स्वस्त औषधं देण्याची ही योजना आहे. तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. कोण उघडू शकतं जन औषधी केंद्र? पहिल्या कॅटेगरीत कोणीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डाॅक्टर, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर स्टोअर उघडू शकतात. दुसऱ्या कॅटेगिरीत ट्रस्ट, एनजीओ, खासगी हाॅस्पिटल, सोसायटी आणि सेल्फ हेल्प ग्रुप यांना ही संधी मिळू शकेल. तिसऱ्या कॅटेगिरीत राज्य सरकारनं नाॅमिनेट केलेली एजन्सी असेल. दुकान उघडण्यासाठी 120 स्क्वेअर फूट एरिया लागेल. पैसे कमवले आणि खर्च केले, पण या 5 गोष्टी केल्यात का? स्टोअर उघडायला 2.50 लाख रुपयांची मदत जन औषधी केंद्रावरून औषधं विकल्यावर मिळणारं 20 टक्के मार्जिन असेलंच. शिवाय दर महिन्याला होणाऱ्या विक्रीवर वेगळा 15 टक्के इन्सेटिव मिळेल. हे इन्सेटिव जास्तीत जास्त दर महिन्याला 10 हजार रुपये असेल. जोपर्यंत 2.50 लाख रुपये विक्री पूर्ण होत नाही, तोपर्यंत इन्सेटिव मिळेल. Life In लोकल- तिला पाहताच तो प्रेमात पडला आणि तिच्यासाठी तो तीच ट्रेन पकडू लागला कशी होईल कमाई? जन औषधी केंद्रद्वारा महिन्यात जेवढी औषधांची कमाई होईल, त्याच्या 20 टक्के कमिशन रूपात मिळतील. यामुळे तुम्ही महिन्याला 1 लाख रुपयांची विक्री केलीत तर तुम्हाला महिन्याला 20 हजार रुपये मिळतील. ट्रेड मार्जिनव्यतिरिक्त सरकार दर महिन्याला विक्रीवर 15 टक्के इन्सेटिव देईल. जे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाईल. Life In लोकल- तिला पाहताच तो प्रेमात पडला आणि तिच्यासाठी तो तीच ट्रेन पकडू लागला कसा कराल अर्ज? जन औषधी केंद्र उघडण्यासाठी तुम्ही https://janaushadhi.gov.in/ वर जाऊन फाॅर्म डाऊनलोड करा. अर्ज ब्युरो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडिया (BPPI)च्या जनरल मॅनेजरच्या नावावर पाठवावा लागेल. हा पत्ता या वेबसाइटवर आहे. आॅनलाइन अर्ज जन औषधी केंद्रासाठी आॅनलाइन अर्ज https://janaushadhi.gov.in/ वर करता येईल. तिथे आवश्यक कागदपत्र अपलोड करून फाॅर्म सबमिट करता येईल. विदर्भातील नेता बसणार विरोधी पक्षनेतेपदी? या आणि इतर 18 टॉप न्यूज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







