Home /News /money /

मोदी सरकार 2 वर्षांपर्यंत भरणार तुमचा PF, वाचा कुणाला होणार फायदा

मोदी सरकार 2 वर्षांपर्यंत भरणार तुमचा PF, वाचा कुणाला होणार फायदा

कोरोना काळात सरकारने सामान्यांना दिलासा देणाऱ्या विविध योजना लाँच केल्या आहेत. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये आत्मनिर्भर भारत रोजगार योजना देखील सुरू केली आहे.

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: कोरोना काळात (Coronavirus) केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देण्यासाठी अनेक योजनांची सुरुवात केली आहे. सरकारने चौथ्या आर्थिक पॅकेजमध्ये आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Atma Nirbhar Bharat Rojgar Scheme) सुरू केली आहे. कर्मचारी आणि रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. सरकारने असे म्हटले आहे की योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू करण्यात आली आहे आणि 30 जून 2021 पर्यंत ही योजना असेल. वाचा या योजनेतून नेमका कुणाला फायदा होणार आहे. कुणाला मिळणार फायदा? नवीन रोजगारांना प्रोत्साहन देणे हे या योजनेचे लक्ष्य आहे. याअंतर्गत ज्या कंपन्या नवीन लोकांना रोजगार देत आहेत आहेत म्हणजेच जे आधीपासून epfo अंतर्गत नोंदणीकृत सदस्य नाही आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळेल. त्याचप्रमाणे महिन्याला 15000 पेक्षा कमी पगार असणाऱ्यांना किंवा 1 मार्च 2020 ते 31 सप्टेंबर 2020 दरम्यान नोकरी गेली आहे अशांना या स्कीमचा फायदा मिळेल. पीएफचे पैसे देणार सरकार या योजनेअंतर्गत नवीन कर्मचाऱ्यांचे नाव epfo अंतर्गत जोडले जाईल. या योजनेअंतर्गत ईपीएफओ शी  संबंधित कर्मचाऱ्यांच्या पीएफची संपूर्ण 24 टक्के भागीदारी 2 वर्षासाठी सरकार देईल. (हे वाचा-केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक आणि लाखोंची कमाई, हे आहेत सर्वात बेस्ट पर्याय) असा मिळेल फायदा सरकार पुढील 2 वर्षापर्यंच सबसिडी देत आहे. 1000 पेक्षा कमी लोकांना रोजगार देणाऱ्या संस्थांमध्ये पीएफचे 12 टक्के Employee's contribution आणि 12 टक्के employer's contribution असं 24 टक्के अनुदान सरकारतर्फे देण्यात येईल. 1000 पेक्षा अधिक नोकरदार असलेल्या कंपन्यांना नोकरदाराच्या EPF चा 12 टक्के भाग सरकार देणार. 65 टक्के संस्था यामध्ये कव्हर केल्या जात आहेत. (हे वाचा-सामान्यांसाठी घरखरेदी झाली स्वस्त, या कंपनीने घटवले Home Loan वरील व्याजदर) कुणाला मिळेल फायदा? EPFO रजिस्टर्ड संस्थांमध्ये महिना 15000 पेक्षा कमी पगारावर असणाऱ्या नव्या नोकरदारांना त्याचप्रमाणे नव्याने नोकरी लागलेल्यांना या योजनेचा फायदा मिले. यामध्ये कोविड काळात म्हणजे 1  मार्च ते 30 सप्टेंबर काळात जुनी नोकरी गमावली आणि नव्याने 1 ऑक्टोबर किंवा त्यानंतर नोकरी लागलेले सगळे नोकरदार समाविष्ट आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Pf

    पुढील बातम्या