Home /News /money /

खूशखबर! सामान्यांसाठी घरखरेदी झाली स्वस्त, या हाउसिंग फायनान्स कंपनीने कमी केले गृहकर्जावरील व्याजदर

खूशखबर! सामान्यांसाठी घरखरेदी झाली स्वस्त, या हाउसिंग फायनान्स कंपनीने कमी केले गृहकर्जावरील व्याजदर

Bajaj Housing Finance Limited Home Loan: ही कंपनी आता 6.90 टक्के दराने ग्राहकांसाठी गृहकर्ज उपलब्ध करणार आहे.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: खाजगी क्षेत्रातील दिग्गज फायनान्स कंपनी असणाऱ्या बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड  (Bajaj Housing Finance Limited) कंपनीने त्यांचे गृहकर्ज (Home Loan) आता स्वस्त केले आहे. या कंपनीकडून आता ग्राहकांना 6.90 टक्के व्याजदराने गृहकर्ज घेता येणार आहे. कोरोनाच्या (Corornavirus) या संकटकाळात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनतर आता  बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड (BHFL)ने देखील गृह कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड ही बजाज फायनान्स लिमिटेडची 100 टक्के सहयोगी कंपनी आहे.  बजाज फायनान्स लिमिटेड (Bajaj Finance Limited)ची सहयोगी कंपनी असणाऱ्या या कंपनीने असे म्हटले आहे की, आता गृह कर्जावरील व्याजदर 6.90 टक्क्यापासून सुरू होतील. त्यामुळे ज्या ग्राहकांचे  घर घेण्याचे स्वप्न आहे ते BHFL च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकता. याठिकाणी तुम्ही 3.5 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकता. (हे वाचा-LPG सिलेंडरसाठी देखील आहे Insurance Cover, मिळू शकतो 30 लाखांपर्यंत फायदा) BHFL ने अशी  माहिती दिली आहे की, व्याजदरात कपात केल्यामुळे आता ग्राहकांना कमी दरात घरखरेदी करता येईल. त्याचप्रमाणे त्यांचा दर महिन्याचा EMI देखील कमी होईल, त्यामुळे मासिक बजेट स्थीर होण्यास मदतच होईल. याशिवाय गृहकर्जाचा कालावधी समाप्त होईपर्यंत ग्राहकांना व्याज स्वरुपात दिलेल्या रकमेतून फायदा होईल. व्याजदरामध्ये होणारी प्रत्येक कपात थेट कर्जाची किंमत कमी करते आणि ग्राहकांना फायदा मिळतो असे कंपनीने म्हटले आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या किंमतीच्या कर्जावर व्याज दर स्वतंत्रपणे ठेवण्यात आला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. (हे वाचा-केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक आणि लाखोंची कमाई, हे आहेत सर्वात बेस्ट पर्याय) पीटीआय वृत्तसंस्थेच्या मते जर एखाद्याने एक कोटी रुपयाचे गृह कर्ज 30 वर्षांलाठी 6.90 टक्के दराने घेतलं तर त्या व्यक्तीला दर महिन्याला 65,860 रुपयांचा EMI द्यावा लागेल. याआधारे गृह कर्जाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला एकूण  1,37,09,606 रुपयांचे पेमेंट करावे लागेल. दरम्यान याच किंमतीचं कर्ज एखाद्या ग्राहकाने 7 टक्के व्याजदराने घेतलं तर तर त्याला दरमहा  66,530 रुपये इतकं पेमेंट करावं लागेल आणि कर्जाचा कालावधी समाप्त होईपर्यंत त्याने भरलेली एकूण रक्कम  1,39,50,889 रुपये असेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या