मराठी बातम्या /बातम्या /मनी /म्हाडाचं रजिस्ट्रेशन करताय? मग चुकूनही विसरु नका या गोष्टी, अन्यथा...

म्हाडाचं रजिस्ट्रेशन करताय? मग चुकूनही विसरु नका या गोष्टी, अन्यथा...

म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी

Mhada lottery : म्हाडाची मोठी लॉटरी जाहीर झाली आहे. यासाठी अर्ज करणार असाल तर काही गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. या गोष्टी कोणत्या ते पाहूया...

मुंबई, 27 मे : आपलं एक घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता हे स्वप्न सत्यात उतरवण्याची सुवर्ण संधी आहे. कारण म्हाडाने पुन्हा एकदा मोठी घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे. या लॉटरीमध्ये नागरिकांना तीन गटांमध्ये फॉर्म भरायला मिळणार आहे. या 22 मे पासून ही लॉटरी भरण्याची सुरुवात झालेली आहे. पण हे रजिस्ट्रेशन करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण अर्ज करण्याची लास्ट डेट ही 26 जून असल्याची माहिती समोर आलीये.

म्हाडासाठी अर्ज करण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला mhada gov in MHADA हाउसिंग लॉटरी या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. येथे म्हाडाच्या सूचनांचा बॉक्स दिलेला असतो. एवढंच नाही तर वर पेज सुरू झाल्यावर लॉगइन आणि रजिस्टर असे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील.

अर्ज कसा कराल?

वेबसाइटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पर्याय निवडा. हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्याविषयीची सर्व माहिती भरावी लागेल. एवढंच नाही तर आधार कार्ड नंबर आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर येथे भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करा. यानंतर महत्त्वाचे डिटेल्स, पगार किंवा व्यवसाय करत असाल तर त्याची संपूर्ण माहिती भरा. तुम्ही जर कोट्यातून घर घेणार असाल तर त्याची माहिती आणि यासोबतच महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स जमा करणं गरजेचं असतं.

MHADA lottery 2023 : एक जरी कागदपत्र चुकलं तर हुकेल तुमच्या स्वप्नातलं घर, असा करा 'म्हाडा'साठी अर्ज!

अखेरची तारीख कोणती?

म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे अजुन एक महिना आहे. कारण अर्ज करण्याची अखेरची तारीख ही 26 जून आहे. तोपर्यंत तुम्ही अर्ज आणि पेमेंट करु शकता. यासोबतच अर्जदाराचं वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असलं पाहिजे. एवढंच नाही तर त्या व्यक्तीच्या नावावर कोणतंही घर नसावं. यासोबतच 15 वर्षांपासून तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

कमी उत्पन्न गटातील लोकांना होतो फायदा?

म्हाडाच्या लॉटरीमुळे कमी उत्पन्न गटातील लोकांना खूप फायदा होता. या लॉटरीमुळे त्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होतं. तुम्ही म्हाडासाठी अर्ज केला नसेल तर तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तुम्ही सर्व डॉक्यूमेंट्स पूर्ण भरुन अर्ज करु शकता.

Mhada Lottery 2023 : मुंबईत हक्काचं घर हवं, कसा करायचा म्हाडासाठी अर्ज इथे पाहा

फॉर्म भरताना करु नका या चुका

- तुमचं नाव, पत्ता आणि तुम्ही काय काम करता याविषयी योग्य माहिती भरा. यामध्ये कुठेही तफावत आढळता कामा नये. अन्यथा तुम्हाला घर मिळू शकणार नाही.

- रजिस्ट्रेशन आणि पेमेंट रिसिट दोन्ही डाउनलोड करा. या मेलवरही ठेवा, चुकून हार्ड कॉपी कुठे हरवली झाली तर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असायला हवी.

- अर्ज केल्यानंतर फाइल तयार करा. मात्र यावेळी तीन फाइल तयार करा. एक बँकेसाठी, दुसरी म्हाडा ऑफिससाठी आणि तिसरी फाइल तुमच्यासाठी तुमच्याकडे बॅकअपसाठी ठेवा.

- तुम्ही भरलेल्या सर्व डॉक्युमेंट ऑरिजनल आणि त्यासोबत झेरॉक्सचीही ट्रू कॉपी किंवा सेल्फ अटेस्टेड करून ठेवा.

- डॉक्यूमेंटमधील माहिती आणि तुम्ही दिलेल्या माहितीमध्ये साम्य असलं पाहिजे. अन्यथा तुमचं नाव यादीतून काढून टाकलं जाईल.

First published:
top videos

    Tags: Mhada Lottery, Money, Money18