मराठी बातम्या /बातम्या /मनी /MHADA lottery 2023 : एक जरी कागदपत्र चुकलं तर हुकेल तुमच्या स्वप्नातलं घर, असा करा 'म्हाडा'साठी अर्ज!

MHADA lottery 2023 : एक जरी कागदपत्र चुकलं तर हुकेल तुमच्या स्वप्नातलं घर, असा करा 'म्हाडा'साठी अर्ज!

MHADA lottery 2023 : एक जरी कागदपत्र चुकलं तरी हुकेल तुमच्या स्वप्नातलं घर, म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय मग हे वाचाच

MHADA lottery 2023 : एक जरी कागदपत्र चुकलं तरी हुकेल तुमच्या स्वप्नातलं घर, म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय मग हे वाचाच

MHADA lottery 2023 : एक जरी कागदपत्र चुकलं तरी हुकेल तुमच्या स्वप्नातलं घर, म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय मग हे वाचाच

मुंबई : तुमच्या स्वप्नातलं घर घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. म्हाडाने पुन्हा एकदा मोठी घरांची लॉटरी जाहीर केली आहे. यामध्ये नागरिकांना तीन गटांमध्ये फॉर्म भरता येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी 22 मे रोजी सुरुवात झाली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांच्या विक्रीसाठी 22 मेपासून अर्ज काढले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 जून असल्याचं सांगण्यात आलं आहे.

म्हाडामधील घरांची संख्या

अत्यल्प गट - २७९०

अल्प गट - २७८८

मध्यम गट - १३९, १२०

महत्त्वाच्या तारखा कोणत्या?

ऑनलाइन नोंदणी सुरुवात  22-मे-23 दुपारी 3:00 वाजता

ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख 26-जून-23 संध्याकाळी 6:00 वाजता

ऑनलाइन पेमेंट  शेवटची तारीख 26-जून-23 रात्री 11:59 वाजता

RTGS/NEFT पेमेंट शेवटची तारीख 28-जून-23 संध्याकाळी 6:00 वाजता

सोडतीची तारीख 18 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून

स्थळ वांद्रे येथील रंगशारदा सभागृह

म्हाडाची 2 घरं मिळू शकतात? कसा अर्ज करायचा आणि काय आहे नियम पाहा

कसा करायचा अर्ज?

1- म्हाडाच्या लॉटरीची अधिकृत वेबसाइट- lottery.mhada.gov.in. जा

2- वेबसाइटचे होम पेज तुमच्या स्क्रीनवर दिसेल

3- "नोंदणी करा" म्हणणाऱ्या पर्यायावर क्लिक करा आणि तुमची माहिती अपलोड करा

4- आता, तुमचा वैयक्तिक माहिती अपलोड करुन फॉर्म भरा आणि कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा

5- आवश्यक अर्ज शुल्क ऑनलाइन भरा

6- अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट वर टॅप करा

7- तुमच्या संदर्भासाठी वेबसाइटवरून लॉटरी नोंदणी फॉर्म डाउनलोड करा

Mhada Lottery 2023 : नवरा-बायको दोघांनाही घरं लागलं तर दोन्ही घरं घेता येतात का?

कोणते कागदपत्र महत्त्वाचे?

1- अर्जदाराचे आधार कार्ड

2- अर्जदाराचा जन्म दाखला

3- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र

4- पात्र ड्रायव्हिंग लायसन्स

5- पॅन कार्ड

6- बँक खात्याचे तपशील

7- अर्जदाराचा पासपोर्ट

8- शाळा सोडल्याचा दाखला

9- मतदार ओळखपत्र

First published:
top videos

    Tags: Mhada Lottery, Mumbai