जाहिरात
मराठी बातम्या / मनी / MHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी! पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज?

MHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी! पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज?

mhada

mhada

MHADA Lottery 2023 : म्हाडा हाउसिंगद्वारे चार हजारहून अधिक घरांसाठी सोडत आहे. 22 मे पासून या घरांसाठी अर्ज करता येणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : मुंबईत छोटंसं का होईना आपलं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतंच असतं. प्रत्येकाला महागडी घरं परवडत नाहीत. तर सर्वसामान्य लोकांच्या मनात आणि स्वप्नात असलेलं घर साकारण्यासाठी म्हाडाने लॉटरीची सुविधा काढली आहे. ही घरं बाजारपेठेतील किंमतीपेक्षा कमी किंमतीमध्ये नागरिकांना मिळतात. म्हाडा हाउसिंगद्वारे चार हजारहून अधिक घरांसाठी सोडत आहे. 22 मे पासून या घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. सगळी प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही एजंडला पैसे देऊ नका असं आवाहन म्हाडाकडून करण्यात आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

लॉटरीत सहभागी होण्यासाठी नोंदणी, कागदपत्रे सादर करणे, पात्रता निश्चित करणे, ऑनलाइन लॉटरी वितरण, निवासाची रक्कम भरणे या सर्व प्रक्रिया ऑनलाइन कराव्या लागतील. तसेच मोबाईल ऍप्लिकेशन (म्हाडा हाउसिंग लॉटरी सिस्टीम) अँड्रॉईड मोबाईलवर प्ले स्टोअर आणि ऍपल मोबाईलवरील ऍप स्टोअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? A टू Z सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

सोडती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना 26 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. 26 जून रोजी रात्री 11.59 वाजता क्रेडिट, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अर्जासह उत्पन्न गटनिहाय अर्ज करून पेमेंट करु शकतात. तसेच, 28 जूनपर्यंत बँक वेळेत RTGS, NEFT द्वारे पैसे भरता येऊ शकतात.

म्हाडाचं रजिस्ट्रेशन करताय? मग चुकूनही विसरु नका या गोष्टी, अन्यथा…

तुम्ही म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरुन अर्ज करू शकता. तुम्हाला घर लागलं की नाही याचा ड्रॉ १८ जुलै रोजी कळणार आहे. तुम्ही याचा निकाल म्हाडाच्या वेबसाईटवर पाहू शकता. तुम्हाला अर्ज करण्यात अडचणी आल्या किंवा काही शंका असतील तर तुम्ही 022-69468100 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात