जाहिरात
मराठी बातम्या / मनी / म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? A टू Z सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? A टू Z सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

म्हाडाच्या फॉर्मविषयी सर्व उत्तर घ्या जाणून

म्हाडाच्या फॉर्मविषयी सर्व उत्तर घ्या जाणून

Mhada Lottery 2023 : आपल्या बजेटमध्ये घर मिळावं यासाठी अनेक जण हे म्हाडाचा फॉर्म भरत असतात. मात्र असं करताना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 मे : म्हाडाचं घर म्हणजे आपल्या बजेटमध्ये स्वप्नातल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्ण संधी असते. आता म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 83 घरांच्या विक्रीसाठी 22 मेपासून अर्ज निघाले आहेत. हे अर्ज भरण्याची अखेरची तारीख 26 जून असल्याची माहिती आहे. मात्र रजिस्ट्रेशन करत असताना अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व शंका येथेच दूर होतील.

म्हाडाच्या घरासाठी कोणं अर्ज करु शकतो?

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी आवलं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं. यासोबतच तुमचं पॅनकार्ड असायला हवं. एवढंच नाही तर तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या नावावर दुसरं कोणतंही घर असू नये. अन्यथा तुमचं नाव या लॉटरीमधून बाद केलं जाऊ शकतं.

म्हाडाचं रजिस्ट्रेशन करताय? मग चुकूनही विसरु नका या गोष्टी, अन्यथा…

अर्ज कुठे करायचा?

म्हाडाचं घर घेण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करु शकता. येथे तुम्हाला एक अर्ज दिला जाईल तो तुम्हाला भरावा लागेल. आवश्यक सर्व माहिती आणि डॉक्यूमेंट्स द्यावे लागतील. हे सर्व लॉगइन डिटेल्स तुम्हाला सेव्ह करणं आवश्यक असतं. आता तर नवीन नियमांनुसा तुम्हाला प्रत्येक वेळी लॉगइन करावं लागणार नाहीये.

या आहेत महत्त्वाच्या तारखा

-22 मे पासून ऑनलाइन नोंदणी सुरुवात 26 जून 23 ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख -26 जून 23 ऑनलाइन पेमेंट शेवटची तारीख -28 जून 23 RTGS/NEFT पेमेंट शेवटची तारीख -18 जुलै 2023 सोडतीची तारीख -स्थळ वांद्रे येथील रंगशारदा सभागृह

कोणते डॉक्यूमेंट्स आवश्यक?

म्हाडाच्या घरांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी 7 कागदपत्र जमा करणं आवश्यक असतं. ऑनलाइन रजिस्ट्रेशन होईल. यामध्ये तुमचं एक ओळख पत्र द्यावं लागेल. ते आधारकार्ड असल्यास त्यावर तुम्ही आता राहात असलेला पत्ता टाकणं आवश्यक आहे. तहसीलदार यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र, त्यावर क्यूआर कोड असायला हवा. यासोबतच एक उत्पन्नाचा पुरावा आवश्यक आहे. यामध्ये तुमचं बँक स्टेटमेंट आणि सॅलरी स्लीप या गोष्टी सोबत असायला हव्यात. यासोबतच तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणंही गरजेचं असतं. तुम्ही जर कोट्यातून अर्ज केला असल्यास तुम्हाला त्या कोटासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतील. तसंच यासोबत स्वघोषणात्र देखील जोडणं आवश्यक असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात