जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Mhada lottery 2023 : म्हाडासाठी अर्ज करताना अडचणी येतात? मग तुमच्या प्रश्नाचं इथे मिळेल उत्तर

Mhada lottery 2023 : म्हाडासाठी अर्ज करताना अडचणी येतात? मग तुमच्या प्रश्नाचं इथे मिळेल उत्तर

mhada helpline

mhada helpline

Mhada lottery 2023 : अर्ज भरताना अडचण आली तर कुठे आणि कसा करायचा संपर्क, तुमच्या शंकांचं निरसन आणि उत्तर इथे मिळणार

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : तुम्ही जर मुंबई, पुणे किंवा नागपूरमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर म्हाडासाठी तुम्ही अर्ज करू शकता. पुण्यात म्हाडाने 5 हजारहून अधिक घरांची लॉटरी आणली आहे. तर मुंबई आणि नागपूरमध्ये देखील लॉटरीसाठी अर्ज करता येणार आहे. यंदा म्हाडाने अनेक नियमांमध्ये बदल केला आहे. दलालांची मध्यस्ती रोखण्याच्या अनुषंगाने आणि मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी हे बदल महत्त्वाचे असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे. 5 जानेवारीपासून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करून पेमेंट करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी असणार आहे. कुठे करायचा अर्ज? housing mhada gov in या वेबसाईटवर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचे आधार आणि पॅन कार्ड देखील जोडावे लागले. त्यासोबत तुम्हाला तुमची माहिती देखील भरायची आहे. त्यानंतर तुम्ही म्हाडाच्या घरासाठी अर्ज करू शकता. तुम्ही कोणत्या गटातून फॉर्म भरत आहात आणि कोणत्या कोट्यातून भरत आहात त्यानुसार सगळी कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागणार आहेत.

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेण्यासाठी भरावे लागणार दुप्पट पैसे?

21 नाही तर 7 कागदपत्र जमा करावी लागणार आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, जात प्रमाणपत्र आणि त्या प्रवर्गाचा दाखला जमा करावा लागेल. जर तुम्ही कोट्यातून अर्ज करत असाल तर त्याचे नियम वेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याची कागदपत्र जमा करणं आवश्यक आहे. अडचण आल्यास कुठे संपर्क करायचा? तुम्हाला जर अर्ज करताना त्यामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही म्हाडाच्या जवळच्या कार्यालयात जाऊन तिथे संपर्क साधू शकता. याशिवाय 02226598924/9834637538 या क्रमांकावर फोन करून तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. म्हाडाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हा सेंट्रल लाईन क्रमांकही देण्यात आला आहे. या 18004250018 क्रमांकावर तुम्ही फोन करून तुमची अडचण सांगू शकता.

जगातील प्रत्येक व्यक्तीवर आहे 31 लाखांचे कर्ज, रिपोर्टमध्ये खुलासा

महत्त्वाच्या तारखा विसरू नका 5 फेब्रुवारी - अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 6 फेब्रुवारी- ऑनलाइन पेमेंटचा शेवटचा दिवस 6 फेब्रुवारी- NEFT पेमेंटचा शेवटचा दिवस 13 फेब्रुवारी - ड्राफ्ट अॅप्लिकेशन पब्लिश 15 फेब्रुवारी- फायनल अॅप्लिकेशन 17 फेब्रुवारी - लॉटरी ड्रॉ 20 फेब्रुवारी - रिफंड बदलले नियम पूर्वी लॉटरीसाठी दरवेळी रजिस्ट्रेशन करावं लागत होतं. मात्र आता एकदा केलेलं रजिस्ट्रेशन म्हाडाकडे सेव्ह राहणार आहे. तुम्हाला लॉगइन आणि पासवर्ड अपलोड करून पुन्हा लॉगइन करता येऊ शकतं. एकदा रजिस्ट्रेशन केलं की त्या आयडीवरून तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला आधी घर लागलं असेल आणि तुम्ही दुसऱ्यांदा अर्ज केला तर तुमचं नाव ड्रॉप केलं जाणार आहे. मात्र तुमचं आधीच्या लॉटरीत नाव लागलं नाही तर तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता.

सर्वात स्वस्त होम लोन कुठे मिळेल? जाणून घ्या डिटेल्स

अनामत रक्कम वाढण्याची शक्यता म्हाडाचं घर घेताना भराव्या लागणाऱ्या अनामत रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर तुम्हाला अनामत रक्कम जास्त भरावी लागू शकते. अत्यल्प गट- पूर्वी 5 हजार होती आता ही रक्कम 10 हजार केली जाण्याची शक्यता आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अल्प गटासाठी ही मर्यादा 10 हजार होती ती आता 20 हजार केली जाण्याची शक्यता आहे. मध्यम गटासाठी आता 30 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. उच्च गटासाठी 40 हजार रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे>

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात