मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर इथे म्हाडाच्या घरांसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. 5 आणि 6 जानेवारीपासून हे रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. तुम्ही म्हाडासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला काही नियम आणि अटी माहिती असायला हव्यात. याशिवाय यंदाच्या लॉटरीमध्ये म्हाडाने काही बदल केले आहेत. पूर्वी जे काम 21 कागदपत्र देऊन व्हायचं आता त्यासाठी 7 कागदपत्र लागणार आहेत. 7 कागदपत्र तुम्हाला रजिस्ट्रेशनदरम्यान जमा करावी लागणार आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण होऊन तुम्हाला घरासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी असणारी अनामत रक्कम देखील वाढवण्याबाबत म्हाडा सध्या विचार करत आहे. कोकण मंडळाने तसा प्रस्ताव दिला आहे. दलाली रोखण्यासाठी म्हाडा ह्या प्रस्तावावर विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे. आता प्रश्न हा आहे की जर तुमच्याकडे म्हाडाचं आधीच एक घर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता का? कुटुंबातील दोन व्यक्ती म्हाडासाठी अर्ज करू शकतात का? जर दोघांनाही घर लागलं तर मिळू शकतं का? त्यासाठीचे नियम अटी काय आहेत याबाबत देखील आपण जाणून घेणार आहोत.
Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेण्यासाठी भरावे लागणार दुप्पट पैसे?जर तुम्ही आणि तुमच्या घरातील आणखी दोन किंवा तीन व्यक्तींनी म्हाडासाठी अर्ज केला असेल आणि दोघांना घर लागलं तर तुम्हाला घेता येईल का? याचं उत्तर आहे की तुमच्या नावावर जर घर नसेल तर तुम्हाला घर घेता येऊ शकतं. याचा अर्थ असा की नवरा बायको दोघांनी अर्ज भरला असेल तर आणि दोघांना घर लागलं तर मात्र एकाला रद्द करावं लागू शकतं.
मात्र आईच्या नावे आणि मुलाला घर लागलं तर मात्र दोघांनाही घर घेता येऊ शकतं. याशिवाय म्हाडाला मुंबईत घर असेल तर तुम्ही पुणे नागरपूरसाठी अर्ज करू शकता. मात्र आधी मुंबईत घर लागलं असेल आणि पुन्हा अर्ज केला तर मात्र तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो.

)







