मराठी बातम्या /बातम्या /मनी /

म्हाडाची 2 घरं मिळू शकतात? कसा अर्ज करायचा आणि काय आहे नियम पाहा

म्हाडाची 2 घरं मिळू शकतात? कसा अर्ज करायचा आणि काय आहे नियम पाहा

एकावेळी किती घरांसाठी अर्ज करता येतो? एकावेळी म्हाडाची दोन घरं मिळू शकतात का पाहा नियम काय सांगतो

एकावेळी किती घरांसाठी अर्ज करता येतो? एकावेळी म्हाडाची दोन घरं मिळू शकतात का पाहा नियम काय सांगतो

एकावेळी किती घरांसाठी अर्ज करता येतो? एकावेळी म्हाडाची दोन घरं मिळू शकतात का पाहा नियम काय सांगतो

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : तुमचं म्हाडामध्ये घर घेणार असाल तर आता तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. म्हाडाने यंदा अनेक नियम बदलले आहेत. पूर्वी 21 कागदपत्र सादर करावी लागत होती. आता 7 कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. ती कागदपत्र रजिस्ट्रेशन करताना जमा करावी लागणार आहेत. याची सगळी पडताळणी ऑनलाईन होऊन पुढे लॉटरीसाठी जमा होणार आहेत.

म्हाडासाठी रजिस्ट्रेशन आणि अर्ज करायला 5 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. तर शेवटची तारीख 5 फेब्रुवारी आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर करू शकता कारण फारच कमी दिवस शिल्लक असणार आहे.

तुम्ही एकावेळी किती घरांसाठी अर्ज करू शकता?

तुम्ही म्हाडासाठी अर्ज करत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या गटांसाठी अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या शहरांसाठी आणि घरांसाठी अर्ज करू शकता. याशिवाय तुमच्याकडे मुंबईत म्हाडाचं घर आधीच असेल तर तुम्ही नागपूर आणि पुणे किंवा कोकण विभागासाठी देखील अर्ज करू शकता.

म्हाडाकडून डबल लॉटरी लागली तर दोन्ही घरं घेता येतात का, काय आहे नियम?

तर मिळणार नाही दुसरं घर

तुमच्याकडे जर आधीच म्हाडाचं घर असेल तर तुम्हाला दुसऱ्यांदा घर मिळणार नाही. याशिवाय पती-पत्नी हे म्हाडाच्या घराचे सहमालक असतात. त्यामुळे पतीच्या नावावर घर असेल आणि पत्नीने पुन्हा अर्ज केला तर तुम्हाला घर मिळू शकणार नाही.

तुम्ही मुंबई आणि नागपूर दोन्ही ठिकाणी घरासाठी वेगवेगळा अर्ज केला असेल आणि दोन्ही ठिकाणी घर लागलं तर ते घेता येतं. तशी तुम्हाला कागदपत्रही सादर करावी लागतात. यंदा म्हाडा पूर्णपणे तंत्रज्ञानाचा आधार घेऊन लॉटरी काढली जाणार आहे. याशिवाय तुम्ही म्हाडाच्या अॅपवरूनही अर्ज करू शकता.

Mhada Lottery 2023 : नवरा-बायको दोघांनाही घरं लागलं तर दोन्ही घरं घेता येतात का?

मी म्हाडामधील २ फ्लॅटसाठी अर्ज करू शकतो का?

म्हाडाने एखाद्या व्यक्तीला एकच फ्लॅट दिला आहे आणि तुमच्या आईने शपथपत्रांतर्गत शपथ घेतली आहे किंवा दुसर् या फ्लॅटसाठी अर्ज करताना आपल्यामालकीचा कोणताही फ्लॅट नसल्याचा दावा केला आहे, तर म्हाडा कायद्यानुसार हे वाटप रद्द किंवा मागे घेण्याचा निर्णय घेऊ शकते.

First published:

Tags: Home Loan, Mhada Lottery 2023, Mumbai, Pune