Home /News /money /

कोरोना काळात दिसली विम्याबद्दल भारतीयांची उदासीनता, कोरोना बळींपैकी केवळ 14 टक्के कुटुंबीयांकडून विम्यासाठी दावे

कोरोना काळात दिसली विम्याबद्दल भारतीयांची उदासीनता, कोरोना बळींपैकी केवळ 14 टक्के कुटुंबीयांकडून विम्यासाठी दावे

भारतात आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे 3 लाख 91 हजान नागरिकांची आपले प्राण गमावलेत. मात्र त्यापैकी केवळ 55,276 जणांच्या कुटुंबीयांकडूनच विम्यासाठीचे दावे दाखल करण्यात आले आहेत.

    नवी दिल्ली, 25 जून : भारतात जीवन विमा (Life Insurance) घेण्याबाबत किती उदासीनता आहे, हे नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे (Corona) सुमारे 3 लाख 91 हजान नागरिकांची आपले प्राण (Corona Deaths) गमावले आहेत. मात्र त्यापैकी केवळ 55,276 जणांच्या कुटुंबीयांकडूनच विम्यासाठीचे दावे (insurance claims) दाखल करण्यात आले आहेत. एकूण मृत्युंच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 14 टक्के असल्याची माहिती भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं (Insurance Regulatory and Development Authority of India) दिली आहे. देशात विम्यासाठी आतापर्यंत 55,276 दावे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 48,484 दावे निकाली काढण्यात आल्याचं प्राधिकणानं म्हटलं आहे. म्हणजेच जवळपास 88 टक्के दावे निकाली निघाले असून 3593 कोटींची विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तर आरोग्य विम्यासाठी दाखल 19 लाख 11 हजार दाव्यांपैकी सुमारे 80 टक्के म्हणजेच 15 लाख 39 हजार दावेही निकाली काढण्यात आले असून त्यापोटी 15000 कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. आरोग्य विम्याचे सुमारे 4 टक्के, तर आयुर्विम्याचे 0.66 टक्के दावे फेटाळले गेले आहेत. विमा न घेतल्याने झाली वाताहत विमा न घेतल्याचा मोठा भुर्दंड लाखो भारतीयांना बसल्याची प्रतिक्रिया विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे सदस्य एल. आलमेलू यांनी असोचेमच्या एका कार्यक्रमात बोलताना दिली. कोरोना काळातही विम्याचं संरक्षण नसल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले, अनेकजण कर्जबाजारी झाले तर अनेक नागरिकांना आयुष्यभराची कमाई खर्च करावी लागली. काहीजणांनी आपली मालमत्ता विकून तर काहीजणांनी दागदागिने विकून कोरोनावर उपचार करून घेतले. आयुर्विमा आणि आरोग्य विमा या दोन्ही गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, याची जाणीवदेखील कोरोना काळात अनेकांना झाली आहे. त्यामुळे यापुढे विमा घेण्याबाबत नागरिकांमध्ये सजगता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हे वाचा - तिसऱ्या लाटेत राज्यातील 50 लाख लोकांना होणार कोरोना? इशाऱ्यानंतर सरकार कामाला विमा उद्योगात तेजी कोरोनाच्या काळात विमा उद्योगाला तेजी आली असून गेल्या वर्षभरात या क्षेत्राने गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 टक्के वाढ नोंदवल्याचं आलमेलू यांनी म्हटलंय. मात्र विमा कंपन्यांसमोर यामुळे मोठं आव्हानदेखील निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणावर विम्यासाठीचे अर्ज येत असून काही कंपन्यांनी आता लसीकरण सर्टिफिकेट आणि वैद्यकीय तपासणी अहवालाविना विमा न देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Coronavirus, Insurance, Policy

    पुढील बातम्या