Home /News /maharashtra /

तिसऱ्या लाटेत राज्यातील 50 लाख लोकांना होणार कोरोना? तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार लागलं कामाला

तिसऱ्या लाटेत राज्यातील 50 लाख लोकांना होणार कोरोना? तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार लागलं कामाला

तिसऱ्या लाटेत (Third Wave) महाराष्ट्रात (Maharashtra) सुमारे 50 लाख जणांना कोरोनाचा (Corona) संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 50 लाख अपेक्षित बाधितांपैकी किमान 25 लाख जणांना सरकारी सुविधांची गरज भासेल.

मुंबई 25 जून : कोरोना संसर्गाच्या (Corona Pandemic) दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी (Third Wave) सज्ज राहण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. सरकारी वैद्यकीय सुविधा (Government Medical Facilities) जास्त प्रमाणात उभारण्यावर सरकारचा भर आहे. तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात (Maharashtra) सुमारे 50 लाख जणांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 50 लाख अपेक्षित बाधितांपैकी किमान 25 लाख जणांना सरकारी सुविधांची, आवश्यक औषधं आणि किट्सची गरज भासेल, असं 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्य विभागाने कोविड-19 नियोजनासाठी (Covid19 Plan) 1676 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात कोविड आणि कोविडशी संबंधित आजारांवरची औषधं आणि अन्य साहित्याच्या खरेदीसाठी 782 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसंच, सौम्य ते मध्यम स्वरूपाचा कोविड झालेल्या रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक असलेल्या नव्या औषधांकरिता 893 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणेकरांनो लक्ष द्या! सोमवारपासून कसे असतील निर्बंध, वाचा सविस्तर राज्य सरकार आवश्यक औषधं (Essential Medicines) आणि टेस्टिंग किट्सचा (Testing Kits) साठा वाढवण्याच्या तयारीत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तब्बल आठ लाख व्हायल्स लागतील, असा अंदाज आहे. कोरोना संसर्गाच्या निदानासाठी सव्वा कोटी आरटी-पीसीआर (RT-PCR Tests), तर 87.5 लाख अँटीजेन (Antigen Tests) टेस्टसाठी आवश्यक साहित्याचा साठा सरकार उभा करत आहे. कोविड-19 संदर्भात तज्ज्ञांशी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अशी माहिती देण्यात आली, की राज्यात कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत एकूण सक्रिय रुग्णसंख्या (Active Caseload) एका वेळी जास्तीत जास्त आठ लाखांपर्यंत जाऊ शकते. त्यापैकी किमान चार लाख जणांना सरकारी आरोग्य यंत्रणेची गरज भासणार आहे. एकूण रुग्णांची संख्या 50 लाख अपेक्षित असून, त्यापैकी पाच लाख रुग्ण लहान मुलं असतील, असाही अंदाज आहे. त्यापैकी अडीच लाख मुलं उपचारांसाठी सरकारी आरोग्य यंत्रणेकडे येतील, असा अंदाज आहे. तसंच, एकूण बाधित मुलांपैकी 3.5 टक्के मुलांवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आणि बालरोगतज्ज्ञांच्या (Pediatricians) देखरेखीखाली उपचार करण्याची गरज भासेल, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे. SBI Alert: व्हॅक्सिन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करताय तर सावधान! 'अंतिम आकडा अद्याप निश्चित नाही; मात्र दोन-तीन अंदाजांचा अभ्यास करण्याची गरज आहे. सादरीकरण काही गृहितकांवर आधारित आहे. कृतीदलाच्या सूचनांनुसार त्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील,' असं राज्याचे आरोग्य सचिव एन. रामास्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं. 'पहिल्या लाटेत महाराष्ट्रातली रुग्णसंख्या 19 लाख होती. दुसऱ्या लाटेत या संख्येने 40 लाखांचा टप्पा ओलांडला. कोरोना विषाणूचे नवनवे व्हॅरिएंट्स येत असल्यामुळे तिसऱ्या लाटेतल्या रुग्णसंख्येचा नेमका अंदाज बांधणं अवघड आहे. आम्ही सज्ज आहोत; पण तिसरी लाट येईल की नाही, याबद्दल आत्ताच काही सांगता येत नाही,' असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं. 'खासकरून राज्य किंवा केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या प्रोटोकॉल्समध्ये समाविष्ट नसलेल्या नव्या औषधांचा वापर आणि खरेदी यासाठी सरकार नवं धोरण तयार करील,' असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india

पुढील बातम्या