मुंबई, 21 सप्टेंबर : तुम्हाला बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 221 जागा आहेत. उपव्यवस्थापक, अधिकारी-स्टेनो, अधिकारी- साधारण, अधिकारी – सुरक्षा, बॅंक सहाय्यक – सर्वसाधारण, बॅंक सहाय्यक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी), बॅंक सहाय्यक – ग्रंथपाल, बॅंक सहाय्यक – टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट, बॅंक सहाय्यक – स्वीय सहाय्यक या पदांसाठी ही व्हेकन्सी आहे. शैक्षणिक पात्रता या पदांसाठी त्या त्या क्षेत्रातली पदवी आणि संबंधित क्षेत्रातला अनुभव हवा. खूशखबर! 1 ऑक्टोबरपासून ‘या’ गोष्टी होणार स्वस्त वयाची अट या पदांसाठी 20 ते 40 वर्ष वयोगटातल्या व्यक्ती हव्यात. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 ऑक्टोबर 2019 आहे. सरकारच्या या स्कीममध्ये 200 रुपये गुंतवून मिळवा 35 लाख रुपये अधिक माहितीसाठी http://mumbaidccbank.co.in/ इथे क्लिक करा. तसंच,रिझर्व्ह बँकेत 199 जागा भरायच्या आहेत. ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM या पदांसाठी जागा भरायच्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल झालं पुन्हा महाग, ‘हे’ आहेत आजचे दर पदं आणि पदसंख्या ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल - 156 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR - 20 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM - 23 शैक्षणिक पात्रता ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल यासाठी 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण हवेत. ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR यासाठी अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा तत्सम. ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM यासाठी IIT-खडगपूरमधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी)/IIT-मुंबईमधून अप्लाइड सांख्यिकी आणि इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा IIT कोलकाता, IIT खडगपूर आणि IIM कलकत्ता 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा किंवा तत्सम. आरक्षितांसाठी 50 टक्के हवेत. वयाची अट - 1 सप्टेंबर 2019 रोजी वय 25 ते 30 वर्षापर्यंतच हवं. SC आणि ST ला 5 वर्ष सवलत आहे, तर OBC साठी 3 वर्ष सवलत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 ऑक्टोबर 2019. अधिक माहितीसाठी https://www.rbi.org.in/ इथे क्लिक करा. अर्जाची फी सर्वसामान्यांसाठी 850 रुपये आणि आरक्षितांसाठी 100 रुपये आहे. VIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.