Home /News /money /

आता विसरा फूड डिलिव्हरी ॲप्स! थेट WhatsApp वरून करता येईल McD ची ऑर्डर

आता विसरा फूड डिलिव्हरी ॲप्स! थेट WhatsApp वरून करता येईल McD ची ऑर्डर

ग्राहक व्हॉट्सॲपच्या (McDonalds WhatsApp Ordering System) माध्यमातून त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थ आणि पेयांची ऑर्डर देऊ शकतात. ही ऑर्डर थेट कंपनीकडे नोंदवली जाते.

    नवी दिल्ली, 23 डिसेंबर :कोव्हिड-19 व्हायरसचे (COVID-19) संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला होता, त्यानंतर आता देशभरात अनलॉक करण्यात येत आहे. दरम्यान मार्च 2020 नंतर जगण्याची पद्धतच बदलली. कोरोनाची साथ अजूनही आटोक्यात न आल्यामुळे आपण सगळे न्यू नॉर्मलमध्ये (New Normal) जगतोय. ही जीवनशैली आपण स्विकारली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं, तोंडाला मास्क लावणं आणि वारंवार सॅनिटायझरनी हात धुणं ही त्याची त्रिसूत्री. याच सोशल डिस्टन्सिंग आणि न्यू नॉर्मलचा स्विकार अनेक कंपन्यांनीही केला आहे. फास्टफुडमध्ये जगात आघाडीवर असलेल्या मॅकडोनल्ड्स (McDonald's) या कंपनीनेही आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. आता Mcd भारतात कॉन्टॅक्टलेस  यंत्रणेचा भाग म्हणून व्हॉट्सॲप (Whatsapp) आधारित डिलिव्हरी योजना सुरू केली आहे. सध्या दिल्लीमध्ये ही योजना सुरू झाली असून ग्राहक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थ आणि पेयांची ऑर्डर देऊ शकतात. ही ऑर्डर थेट कंपनीकडे नोंदवली जाते आणि कंपनी तुमची ऑर्डर घरपोच करण्याची व्यवस्था करते. लवकरच ही सेवा देशातील अनेक शहरांत उपलब्ध करून देणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. क्रिकेट स्टारने YouTube स्टारशी बांधली जन्माची गाठ; चहलच्या लग्नाचा PHOTO VIRAL व्हॉट्सॲपनेही कार्ट हे फीचर नुकतंच सुरू केलं असून त्याच्या माध्यमातून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जसं ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करू शकतात तशीच खरेदी ते आता व्हॉट्सॲपमधून करू शकत आहेत. अशी करा व्हॉट्सॲपवरून Mcd  ची ऑर्डर पहिल्यांदा ग्राहकांना ‘9953916666’ हा क्रमांक आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यानंतर मॅकडोनाल्डच्या व्हॉट्सॲपवर ‘Hi’ मेसेज पाठवा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये एक नवीन टॅब दिसेल यामध्ये तुम्हाला पदार्थांची यादी आणि त्यांच्या किंमती कळतील. त्यापैकी तुम्हाला हवे असलेले पदार्थ कार्टमध्ये ॲड करावे लागतील. सावधान! कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचवणारा हँड सॅनिटायझर लहान मुलांसाठी धोकादाय त्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी हवी असलेल्या ठिकाणचा पत्ता आणि संपर्काची माहिती त्यात भरावी लागेल. कंपनीने ऑर्डर कन्फर्म केल्यानंतर कंपनी तुमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर इन्व्हॉइस पाठवून देईल. अशा प्रकारे तुमची ऑर्डर झाली पूर्ण. ते पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मॅकडोनल्डची 100 टक्के कॉन्टॅक्टलेस यंत्रणा कोव्हिड-19 च्या दिवसात ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मॅकडोनल्डने 100 टक्के स्पर्शविरहित सेवा देण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या असून त्याचाच एक भाग म्हणून व्हॉट्सॲपआधारित ऑर्डर यंत्रणा सुरू केली असल्याचं कंपनीच्या वतीने सांगितलं आहे. कंपनीच्या आउटलेटमध्ये डिजिटल मेन्यू उपलब्ध करून दिला आहे, स्मार्टफोनमधून स्कॅन करून ग्राहक ऑर्डर देऊ शकतात त्यामुळे दुकानात येऊनही कमीतकमी स्पर्श होतो. झोमॅटो व स्विगीलाही सूचना अन्नपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) या दोन कंपन्यांनीही आपण कोव्हिड-19 संबंधी सर्व नियम पाळून डिलिव्हरी करत असल्याची खात्री ग्राहकांना करून देण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. रेस्टॉरंटमधून पदार्थ घेऊन डिलिव्हरी देणाऱ्या एक्झिक्यूटिव्हच्या शरीराचं तापमान, ही माहितीही या कंपन्या आपल्या ग्राहकांना देत होत्या. स्पर्शविरहित सेवेसाठी या कंपन्यांनी पैसे देण्याच्या विविध पद्धती अवलंबल्या होत्या जेणेकरून एक्झिक्यूटिव्ह आणि ग्राहकांचा कमीतकमी संपर्क यावा. विशेष म्हणजे मॅकडोनल्ड या दोन्ही कंपन्यांच्यामार्फत इतके दिवस डिलिव्हरी करत होतं त्यांनीही या दोन कंपन्यांना कोव्हिड-19 संबंधी सगळे नियम पाळण्याच्या सूचना केल्या होत्या.
    First published:

    Tags: Pizza

    पुढील बातम्या