डान्स शिकता शिकता क्लीन बोल्ड झालेला भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने मंगळवारी लग्नाची गाठ बांधली. #DhanaSaidYuz असा हॅशटॅग वापरत त्याने हा फोटो शेअर केला आहे. कोण आहे त्याची बायको.. पाहा PHOTO
गुरुग्राम, 22 डिसेंबर : IPL 2020 गाजवणारा युवा क्रिकेटर युजवेंद्र चहलने प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि YouTuber धनश्री वर्माशी आयुष्या भारताच्या वड डे टीममधला भरवशाचा लेग स्पिनर म्हणून नाव कमावणारा युजवेंद्र चहलने गुरुग्रामच्या लेक रिसॉर्टमध्ये धनश्रीशी शानदार सोहळ्यात विवाहगाठ बांधली. त्याने Instagram शेअर केलेल्या लग्नाचा फोटो काही क्षणात viral झाला आहे.
मरून लेहंगा घातलेल्या धनश्रीने पारंपरिक शेरवानीच्या वेशभूषेतल्या युजवेंद्रला माळ घातली. धनश्रीच्या लेहंग्याशी मॅचिंग फेटा युझीने घातला होता. कोरोनाच्या नियमांमुळे (Covid-19 guidelines) मोजक्या आप्तमंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. युजवेंद्र चहलने स्वतः लग्नाचा एक कँडिड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. #DhanaSaidYuz असा हॅशटॅग वापरत त्याने हा फोटो शेअर केला आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, चहलने धनश्रीला लॉकडाउनच्या काळातच प्रपोज केलं होतं. या काळात युझवेंद्रने तिचे डान्स व्हीडिओ YouTube वर पाहिले होते. तिच्याकडून डान्स शिकण्यासाठी त्याने संपर्क साधला. धनश्रीकडून नृत्याचे धडे घेता घेताच त्यांची मैत्री झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला.