जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कमी गुंतवणुकीत रोज हजार रुपये कमवण्याची संधी; जाणून घ्या कोणता आहे ‘हा’ व्यवसाय

कमी गुंतवणुकीत रोज हजार रुपये कमवण्याची संधी; जाणून घ्या कोणता आहे ‘हा’ व्यवसाय

कमी गुंतवणुकीत रोज हजार रुपये कमवण्याची संधी; जाणून घ्या कोणता आहे ‘हा’ व्यवसाय

सध्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्याचं दिसत नाही.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : बाजारात नोकऱ्यांची संख्या मर्यादित असताना अनेकजण व्यवसायाकडे वळत असल्याचं आपण पाहतो. पण व्यवसाय म्हटलं की, भरमसाठ गुंतवणूक करावी लागत असल्याचं नेहमी सांगितलं जातं. परंतु काही व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत चांगला नफा कमवून देऊ शकतात. यात केळीच्या चिप्सचा व्यवसाय अतिशय चांगला असून, यातून मिळणारा नफाही उत्तम आहे. सध्या छोट्या कंपन्या केळीचे चिप्स बनवून विकत आहेत. सध्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्याचं दिसत नाही. केळीच्या चिप्सची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यासाठी तुम्हाला बाजारात तुमचं उत्पादन विकण्यासाठी अधिक मेहनत घ्यायची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे, केळीचे चिप्स बनवण्यासाठी युनिट उभारून अधिक पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. अगदी प्राथमिक स्तरावरही तुम्हाला हा छोटासा व्यवसाय करता येईल. सणांच्या काळात या उत्पादनाला चांगली मागणी असते. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्याचा तुमचा विचार असेल तर यातून चांगला नफाही मिळवता येऊ शकतो. कुठल्या बाबींची असेल आवश्यकता - केळीचे चिप्सचं युनिट उभारण्यासाठी तुमच्याकडे 5,000 स्क्वेअर फुटांची जागा असणं आवश्यक आहे. चिप्स बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या मशीनची गरज असते. चिप्स बनवताना केळं धुण्यासाठी एक मोठा टँक असायला हवा. केळी सोलण्यासाठीही मशीन खरेदी करावं लागेल. याशिवाय केळाचे चिप्स करणं, फ्राय करणं आणि मसाला मिसळण्यासाठीही वेगळ्या मशीन्सची आवश्यकता असते. शिवाय पॅकिंगसाठी पॅकेजिंग मशीन खरेदी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बाजारात ही सर्व मशीन्स सहजरित्या मिळतात. इंडिया मार्ट किंवा अलीबाबा अशा वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीनं याची ऑर्डर देता येऊ शकते. मशीन खरेदी करण्याआधी त्यांची तपासणी करायला हवी. व्यवसायाची सुरूवात करण्याआधी लहान मशीन घेऊन काम सुरू करू शकता. या सर्व मशीन्सवर जवळपास 70 हजार रुपये खर्च करावे लागतील. चिप्ससाठी कच्ची केळी, तेल आणि यात मिसळण्यासाठी मसाल्याची आवश्यकता असेल. पॅकिंगसाठी पॅकेजिंगचे साहित्यही खरेदी करावं लागेल. हेही वाचा -  लोन घेणाऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने दिली मोठी माहिती 50 किलो चिप्स बनवण्यासाठी किती येईल खर्च -  50 किलो चिप्स बनवण्यासाठी कमीतकमी 1,000 रुपयांची केळी, 1,000 रुपयांचं खाद्यतेल, चिप्स फ्रायर मशीन चालवण्यासाठी कमीतकमी 1,000 रुपयांचं डिझेल आणि जवळपास 200 रुपयांच्या मसाल्याची आवश्यकता भासेल. या पद्धतीनं 3,200 रुपयांत 50 किलो चिप्स तयार होतील. किती होऊ शकतो नफा -  एक किलो चिप्स पॅकेट पॅकिंग खर्चासहित 70 रुपयांना पडेल. याला तुम्ही सहज 90 ते 100 रुपये किलो या प्रमाणे विकू शकता. प्रतिकिलो 20 रुपये नफा गृहित धरला तर 50 किलो चिप्स विकल्यास दररोज 1,000 रुपयांचा नफा तुम्ही कमवू शकता. उत्पादनाची विक्री जसजशी वाढेल तसा तुमचा नफाही वाढत जातो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात