मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लोन घेणाऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने दिली मोठी माहिती

लोन घेणाऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने दिली मोठी माहिती

याचा फायदा हॅकर्स घेत आहेत. आता हॅकर्सनी नवीन फंडा शोधून काढला आहे.

याचा फायदा हॅकर्स घेत आहेत. आता हॅकर्सनी नवीन फंडा शोधून काढला आहे.

याचा फायदा हॅकर्स घेत आहेत. आता हॅकर्सनी नवीन फंडा शोधून काढला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई: पैशांची गरज असेल तर आपण लोनसाठी अर्ज करण्याचा विचार करतो. आपल्या फोन किंवा ई मेलवर अनेक लोनच्या ऑपर्स येत असतात. कधी आपण त्या ऑपर्सला बळी पडतो तर कधी आपल्या चुकीमुळे आपण गुगलवर सर्च करून लोनसाठी अर्ज करतो. याचा फायदा हॅकर्स घेत आहेत. आता हॅकर्सनी नवीन फंडा शोधून काढला आहे.

CVV आणि KYC च्या फ्रॉडनंतर आता हॅकर्सनी लोनसाठी युक्ती शोधून काढली आहे. लोन घेणाऱ्यांना थोड्या पैशांचं आमिष दाखवून नंतर त्यांच्याकडून लुटण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रने याबाबत एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र सतत आपल्या ग्राहकांसाठी सोशल मीडियावर अलर्ट देत आहे. नेट बँकिंग असो किंवा UPI पेमेंट किंवा लोन कोणत्याही अनोळखी नंबरला, अॅपला तुमची माहिती देऊ नका. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

बँक ऑफ महाराष्ट्रने एक ट्विट केलं आहे. हॅकर्स तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचे अनेक मार्ग शोधून काढतात. ते कदाचित आपल्याला बनावट आश्वासने आणि हमी कर्ज मंजुरी देखील देऊ शकतात. आपला जीव तसेच आपला पैसा गमावू नये म्हणून सतर्क आणि सतर्क रहा असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रने दिलाय महत्त्वाचा अलर्ट, आताच चेक करा नाहीतर होईल नुकसान

डीएनएस हायजॅकिंगद्वारे, हॅकर्स सुरक्षा उपायांना बायपास करू शकतात आणि बनावट डोमेन आणि सबडोमेन वापरुन फसवणूक करू शकतात. कोणत्याही वेबसाइटला भेट देण्याआधी ते नेहमी तपासून पाहा, तुमची एक चूक तुम्ही आयुभर कमवलेले पैसे गमावू शकते त्यामुळे सतर्क राहा असा इशारा केला आहे.

कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त Home Loan, तुमची बँक आहे का?

कोणती काळजी घ्यावी

कोणालाही आपली माहिती, कार्ड नंबर शेअर करू नका

गुगलवरून फोन नंबर, लिंकवर जाऊन तिथे तुमचे खात्याचे अपडेट देऊ नका

तुमचे खात्याचे अपडेट गुगलवर सेव्ह करू नका

OTP, CVV नंबर कुणालाही देऊ नका

अनोळखी लिंक, थर्ड पार्टी अॅप, बँक सोडून लोन अॅपवरून लोन घेणं टाळा

First published:

Tags: Home Loan, Instant loans, Loan, Pay the loan