जाहिरात
मराठी बातम्या / मनी / केंद्र सरकारची 'ही' योजना पुढील महिन्यापासून बंद होणार; योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल?

केंद्र सरकारची 'ही' योजना पुढील महिन्यापासून बंद होणार; योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल?

केंद्र सरकारची 'ही' योजना पुढील महिन्यापासून बंद होणार; योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल?

या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे फक्त सप्टेंबर महिना आहे. पुढील महिन्यापासून तुम्हाला अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. 30 सप्टेंबरपर्यंत करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

केंद्र सरकारची ‘ही’ योजना पुढील महिन्यापासून बंद होणार; योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल?मुंबई, 5 सप्टेंबर : अटल पेन्शन योजनेत पुढील महिन्यापासून सरकार मोठा बदल करणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून ही योजना अनेकांसाठी बंद करण्यात येत आहे. म्हणजेच आता देशातील अनेकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अटल पेन्शन योजनेच्या नवीन नियमांनुसार, आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. या सरकारी योजनेचा नवा नियम ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. करदात्यांना 30 सप्टेंबरपर्यंत लाभ घेता येईल जर तुम्ही देखील करदाते असाल आणि या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे फक्त सप्टेंबर महिना आहे. पुढील महिन्यापासून तुम्हाला अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. 30 सप्टेंबरपर्यंत करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

Multibagger Share: 2 रुपयांच्या शेअरची कमाल; 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनली 50 कोटी, तुमच्याकडे आहे का?

मात्र ज्यांनी आधीच खाते उघडले आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळत राहील. जर अटल पेन्शन योजना खाते 1 ऑक्टोबरनंतर उघडले असेल आणि ती व्यक्ती आधीच आयकर भरत असेल, तर त्याचे खाते बंद केले जाईल. 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. तुम्हालाही पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्यात खाते उघडू शकता. या व्यतिरिक्त, या योजनेमध्ये, तुम्हाला आयकर कलम 80CCD अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या मारण्याची आता गरज नाही; ‘या’ योजनांमध्ये करा घरबसल्या ऑनलाईन गुंतवणूक

केंद्र सरकारने याआधी ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली होती, पण नंतर त्याची लोकप्रियता पाहता सरकारने ती 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील सर्वांसाठी खुली केली होती. या योजनेत सामील होण्यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून खाते उघडू शकता. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत. केवळ 6 वर्षात या योजनेचा सुमारे 4 कोटी लोकांना फायदा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात