• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Bombay Stock Exchange: शेअर बाजारात मोठी उसळी, आज Sensex ऑल टाइम हायवर

Bombay Stock Exchange: शेअर बाजारात मोठी उसळी, आज Sensex ऑल टाइम हायवर

Share Market Update: बुधवारी बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप (Market Capitalization) 2,42,08,041.64 कोटी रुपये झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 ऑगस्ट: आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजारात (Share Market) सेन्सेक्सने जोरदार उसळी घेतली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (Bombay Stock Exchange) मुख्य इंडेक्स सेनेक्सने पहिल्यांदा 56 हजारांचा स्तर गाठला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात 30 शेअर्सचा सेन्सेक्स 312.44 पॉइंट्सने वाढून 56,104.71 वर पोहोचला आहे. बुधवारी बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप (Market Capitalization) 2,42,08,041.64 कोटी रुपये झाली आहे. मंगळवारी 55792 वर बंद झाला होता सेन्सेक्स एक दिवस आधी मंगळवारी 209.69 पॉइंट्स अर्थात 0.38 टक्क्यांच्या तेजीमुळे सेन्सेक्स 55,792.27 च्या स्तरावर बंद झाला होता. तर निफ्टी 51.60 पॉइंट्सच्या अर्थात 0.31 टक्के तेजीमुळे 16,614.60 स्तरावर बंद झाला होता. Tega Industries ने 750 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी दाखल केले पेपर Tega Industries ने प्रस्तावित आयपीओसाठी सेबीकडे पेपर (DRHP) दाखल केले आहेत. सूत्रांच्या मते, हा आयपीओ 700 ते 750 कोटी रुपयांचा असू शकतो. या आयपीओअंतर्गत येणारा 1,36,69,478 इक्विटी शेअरचा पब्लिक ऑफर पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. ज्यामध्ये होल्डर्स भागीदारीची विक्री करतील. या ऑफरअंतर्गत कंपनीचे प्रमोटर मदन मोहन मोहनका 33,14,657 इक्विटी शेअर आणि मनीष मोहनका 6,62,931 इक्विटी शेअरची विक्री करणार आहेत. हे वाचा-सामान्यांना मोठा झटका, पुन्हा महागला घरगुती गॅस सिलेंडर;मोजावी लागणार एवढी किंमत आज शेअर बाजारात बॅकिंग शेअर्स आणि आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शिवाय तज्ज्ञांच्या मते आठ महिन्यांचे निर्बंध हटवून RBI ने HDFC बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्याची परवानगी दिल्याचा देखील सकारात्मक परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाला हे वाचा-भंगार विकून केली 391 कोटींची कमाई, Indian Railway ची कोरोना काळात झाली चांदी! रुचि सोयाला सेबीने दिली FPO आणण्याची मंजुरी बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीची सहकंपनी असणाऱ्या रुची सोया कंपनीला फॉलो ऑन पब्लिक ऑफर अर्थात एफपीओ (FPO) च्या माध्यमातून 4300 कोटी उभारण्यास मार्केट रेग्यूलेटर सिक्योरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने मंजुरी दिली आहे. जून महिन्यात रुची सोयाने या एफपीओसाठी पेपर दाखल केले होते. यातून उभारण्यात येणाऱ्या अधिकतर फंडचा वापर कंपनीवरील कर्जाचं ओझं हटवण्यासाठी केला जाणार आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: