Home /News /money /

नव्या वर्षात पहिल्याच दिवशी Good News! March महिन्यात विक्रमी GST कलेक्शन

नव्या वर्षात पहिल्याच दिवशी Good News! March महिन्यात विक्रमी GST कलेक्शन

नवीन जीएसटी रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये आधार कार्ड आता आवश्यक असणार आहे. यात फसवणूक करणाऱ्यांविरोधात वॉरंट काढण्यासाठी कायदा करण्यासाठीची सूचना देण्यात आली आहे.

नवीन जीएसटी रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये आधार कार्ड आता आवश्यक असणार आहे. यात फसवणूक करणाऱ्यांविरोधात वॉरंट काढण्यासाठी कायदा करण्यासाठीची सूचना देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रकोप (Coronavirus lockdown) आणि लॉकडाऊनमुळे मोडकळीला आलेली अर्थव्यवस्था (Indian Economy) आता रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे.

  नवी दिल्ली, 1 एप्रिल: कोरोनाचा प्रकोप (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) खराब स्थितीत पोहोचली अर्थव्यवस्था (Indian Economy) आता रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे.  मार्च महिन्यातील जीएसटी कलेक्शनने (record break GST Collection) आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 1 लाख 23 हजार 902 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी मिळाला असल्याचं ट्वीट अर्थमंत्रालयाने केलं आहे. या एकूण जीएसटीत केंद्रीचा जीएसटी 22,973 कोटी, राज्याचा जीएसटी 29,329 कोटी आणि एकीकृत जीएसटी 62,842 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर उपकर 8 हजार 757 कोटी इतका आहे. यात 935 कोटी रुपये वस्तु आयातीवर मिळालेल्या कराचे आहेत.

  ठेवीदारांना मोठा दिलासा, PPF सह व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय सरकारनं घेतला मागे

  कोरोना प्रकोपानंतर गेल्या 6 महिन्यांचं जीएसटी कलेक्शन
  • मार्च 2021              1,23,902
  • फेब्रुवारी 2021          1,13,143
  • जानेवारी 2021          1,19,847
  • डिसेंबर 2020           1,15,174
  • नोव्हेंबर 2020           1,04,963
  • ऑक्टोबर 2020         1,05,155
  कोरोनाच्या प्रकोपानंतर सलग सहाव्यांदा जीएसटी 1 लाख कोटीच्या पार मिळाला आहे.त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
  Published by:News18 Digital
  First published:

  Tags: Coronavirus, Economy, GST, March 2021, Nirmala Sitharaman, Union Finance Minister

  पुढील बातम्या