जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आयुष्यात पाहिले नसतील एवढे पैसे धोनी टॅक्स म्हणून भरतो, आकडा ऐकून व्हाल थक्क

आयुष्यात पाहिले नसतील एवढे पैसे धोनी टॅक्स म्हणून भरतो, आकडा ऐकून व्हाल थक्क

महेंद्रसिंग धोनी यूएस ओपन सामन्याचा आनंद घेताना

महेंद्रसिंग धोनी यूएस ओपन सामन्याचा आनंद घेताना

बापरे! एवढी मोठी रक्कम तर आपण स्वप्नातही विचार करणार नाही, धोनी तर एक वेळचा टॅक्सच भरतो, आकडा पाहून व्हाल थक्क

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: आयुष्यात लाखात गोष्टी करणं म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी हे वेगळंच असतं. वाढती महागाई आणि घरचं बजेट सांभाळताना होणारी सर्वसामान्य माणसाची तारांबळ यामध्ये तो फक्त सेलिब्रिटी आणि क्रिकेटर कसे आयुष्य जगतात हे पाहून ऐकून त्यामध्ये स्वत:ला रममाण करतो. आपणही कधीतरी असे कमवू अशी स्वप्न मानत रंगवतो. आपण आयुष्यात जेवढे पैसे पाहिले नसतील तेवढे पैसे चक्क सर्वांचा लाडका आवडता खेळाडू महेंद्रसिंह धोनी एकवेळी टॅक्स म्हणून भरतो. हा आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो. महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवत आहे. झारखंडमध्ये तो सर्वात जास्त टॅक्स भरणारा नागरिक ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा झारखंडचा सर्वात मोठा करदाता ठरला आहे. चालू आर्थिक वर्षात त्यांनी 17 कोटी रुपयांचा अग्रिम कर जमा केला आहे.

MS Dhoni: धोनीच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला सिनेमा ‘या’ भाषेत, पत्नी साक्षीचाही आहे खास ‘रोल’

गेल्या वर्षी धोनीने 13 कोटी रुपयांचा अॅडव्हान्स टॅक्स जमा केला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी 4 कोटी अधिक अॅडव्हान्स टॅक्स जमा झाला आहे. यामुळे धोनीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तो झारखंडकडून क्रिकेटही खेळला होता. धोनीने झारखंड संघाचा मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे. धोनी क्रिकेटपटूसोबतच एक चांगला बिझनेसमन आणि गुंतवणूकदारही आहे.

MS Dhoni: रिटायरमेंट नाही तर धोनीनं केलं एका प्रॉडक्टचं रिलॉन्चिंग, पण का? पाहा Video

धोनी सेंद्रिय शेतीही करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रांचीतील आपल्या शेतातील उत्पादन ते दुबईला निर्यात करतात. धोनी आजही अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. अकाउंट बुक अॅपमध्ये स्पॉन्सर म्हणूनही त्याने गुंतवणूक केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

या आधीही धोनी 2017-18 मध्ये झारखंडमध्ये सर्वाधिक टॅक्स भरणारा होता. या दरम्यान त्याने 12.17 कोटी रुपयांचा कर भरला होता, पण त्याआधी धोनीने 2016-17 मध्ये 10.93 कोटी रुपये टॅक्स भरला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MS Dhoni , Tax
  • First Published :
जाहिरात
जाहिरात