मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोटांमधून देखील पसरू शकतो कोरोना, RBI ने सांगितले महत्त्वाचे उपाय

नोटांमधून देखील पसरू शकतो कोरोना, RBI ने सांगितले महत्त्वाचे उपाय

कोरोना व्हायरस  (Coronavirus) मुळे संपूर्ण जगभरात दहशतीचं वातावरण आहे. दरम्यान नेहमीच्या वापरातील चलनी नोटा यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो का, असा सवाल सामान्यांना पडला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : कोरोना व्हायरस  (Coronavirus) मुळे संपूर्ण जगभरात दहशतीचं वातावरण आहे. दरम्यान नेहमीच्या वापरातील चलनी नोटा यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो का, असा सवाल सामान्यांना पडला आहे. दरम्यान कागदापासून बनलेल्या नोटां कोरोना व्हायरस पसरण्यासाठी सहाय्यक ठरू शकतात. कोरोनाच्या संकटकाळात तु्म्ही विशेष खबरदारी घेत असाल, तर पैशांते व्यवहार करताना काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

नोटांवर असतात हजारो बॅक्टेरिया

कागदाच्या नोटांबाबात करण्यात आलेल्या एका शोधानुसार एका नोटेवर हजारो बॅक्टेरिया असतात, जे माणसाच्या हातातून त्याच्या शरिरात जाऊन आरोग्याबाबत अडथळे निर्माण करतात. याच आधारावर असा अंदाज बांधण्यात येत आहे की, कोरोना व्हायरस देखील कागदाच्या नोटांमार्फत पसरू शकतो. यामुळे आरबीआयने एक गाइडलाइन जारी केली आहे. कॅश आणि नोटांच्या व्यवहारासंदर्भातील ही गाइडलाइन आहे.

डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करा

अधिकाधिक प्रमाणात डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करण्याची सूचना आरबीआयकडून देण्यात आली आहे. आरबीआयने एनइएफटी, आयएमपीएस, युपीआय आणि बीबीपीएस यांसारख्या फंड ट्रान्सफर सुविधांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सुविधा 24 तास उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे पैसे जमा करण्यासाठी किंवा एखादे पेमेंट करण्यासाठी गर्दीच्या जागी टाळण्याचे देखील आरबीआयने सांगितले आहे. जेणेकरून दोन लोकांमधील संपर्क टाळता येईल.

(हे वाचा-सुकन्या समृद्धी, PPF सह पोस्ट ऑफिस योजनांमध्ये बचतीचा नियम बदलला, मिळेल ही सूट)

पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींपैकी एकाला खोकला झाला असेल, तर तो खोकताना किंवा शिंकताना हाताचा वापर करतो. तेच हात तो पैसे देताना देखील वापरणार, अशा वेळी संक्रमण अधिक जलद वेगाने होण्याची शक्यता असते. परिणामी अशाप्रकारचे व्यवहार टाळण्याचे आरबीआयने सूचवले आहे.

(हे वाचा-15 ऑक्टोबरपासून उघडणार सिनेमागृहं, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी)

अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (CAIT) सरकारकडे असा प्रस्ताव ठेवला आहे की, सरकारने सद्य परिस्थिती पाहता सिंथेटिक पॉलिमरपासून बनणाऱ्या नोटा चलनात आणण्याचा विचार करावा. ज्यामधून कोरोना संक्रमणाचा धोका कागदी नोटांपेक्षा कमी आहे.

First published:

Tags: Money, Rbi, Rbi latest news