Home /News /money /

खऱ्या अर्थाने Happy New Year! 100 रुपयांनी घटले LPG गॅस सिलेंडरचे दर, या ग्राहकांना होणार फायदा

खऱ्या अर्थाने Happy New Year! 100 रुपयांनी घटले LPG गॅस सिलेंडरचे दर, या ग्राहकांना होणार फायदा

एलपीजी ग्राहकांसाठी (Good News for LPG Gas Cylinder Customers) आनंदाची बातमी आहे. 2022 या वर्षाची सुरुवात कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडर (Commercial LPG Gas Cylinder Price) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खास असणार आहे.

    मुंबई, 01 जानेवारी: एलपीजी ग्राहकांसाठी (Good News for LPG Gas Cylinder Customers) आनंदाची बातमी आहे. 2022 या वर्षाची सुरुवात कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडर (Commercial LPG Gas Cylinder Price) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खास असणार आहे. इंडियन ऑइल कंपनीने या ग्राहकांना नवीन वर्षाचं (Indian Oil Reduced Commercial LPG Gas Cylinder Price) गिफ्ट देऊ केलं आहे. 1 जानेवारी 2022 पासून कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या (LPG Price) किमती इंडियन ऑइलने 100 रुपयांपेक्षा जास्त दराने कमी केल्या आहेत. दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डिसेंबर महिन्यात वाढले होते दर याआधी डिसेंबर 2021 मध्ये या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात 103.50 रुपये प्रति सिलेंडरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यावेळी कमर्शिअल गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसली होती. मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नव्हता. आता व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल मालकांना दिलासा मिळाला आहे. हे वाचा-दरमहा होईल लाखोंची कमाई! नवीन वर्षात सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून मिळेल मदत आयओसीच्या मते, दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 102.50 रुपयांनी कमी होऊन1,998.5 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईमध्ये 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 102.50 रुपयांनी कमी होईन 1,948.5 रुपये, कोलकातामध्ये दर 101 रुपयांनी कमी होऊन 2,076 रुपये आणि चेन्नईमध्ये दर 103.50 रुपयांनी कमी होऊन 2,131 रुपयांवर पोहोचले होते. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल नाही विना सब्सिडीच्या 14.2 किलोग्रॅम गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आज कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये आज 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 899.5 रुपये, मुंबईत 899.5 रुपये, कोलकातामध्ये 926 रुपये तर चेन्नईमध्ये 915.5 रुपये आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: LPG Price, New year

    पुढील बातम्या