मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आजपासून सामान्य माणसासाठी बदलणार या 6 गोष्टी, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

आजपासून सामान्य माणसासाठी बदलणार या 6 गोष्टी, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

 1 सप्टेंबरपासून बदलाव होणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये  LPG, Home Loan, EMI, Airlines यांच्यासह आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट आहेत.

1 सप्टेंबरपासून बदलाव होणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये LPG, Home Loan, EMI, Airlines यांच्यासह आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट आहेत.

1 सप्टेंबरपासून बदलाव होणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये LPG, Home Loan, EMI, Airlines यांच्यासह आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : आजपासून काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये बदल होणार असून त्यामुळे सामान्यांच्या आर्थिक जीवनावर परिणाम होणार आहे. 1 सप्टेंबरपासून बदलाव होणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये  LPG, Home Loan, EMI, Airlines यांच्यासह आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट आहेत. वाचा या गोष्टी कोणत्या आहेत. 1. LPG सिलेंडरच्या दरात बदल ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder Price 01 September 2020) च्या किंमतीत सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC)एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केले नाही आहेत. मुंबईमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅसची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. जून आणि जुलै महिन्यात घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. परंतू ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात किंमती स्थीर ठेवण्यात आल्या आहेत. 2. विमान प्रवास महागणार 1 सप्टेंबरपासून विमान प्रवास महाग होईल. नागरी उड्डाण मंत्र्यांनी (Civil Aviation Ministry) 1 सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून विमान सुरक्षा शुल्क (ASF)आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ASF शुल्कामध्ये  देशांतर्गत प्रवाशांसाठी 150 रुपयांऐवजी 160 रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून 4.85 डॉलर ऐवजी 5.2 डॉलर वसूल केले जातील. 3. मोरटोरियम संपल्यामुळे EMI वाढणार EMI देणाऱ्या ग्राहकांसाठी हे महत्त्वाचे आहे. कारण यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून EMI चुकता करण्यासाठी सवलत देण्यात आली होती. ती 31 ऑगस्ट रोजी समाप्त झाली आहे. एसबीआय आणि पीएनबीकडून पुढील आठवड्यात निर्णय होईल. ही सवलत वाढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 4. शेअर बाजारात पैसे लावणाऱ्यांसाठी बदलले नियम शेअर बाजारात (Indian Stock Market) आजपासून सामान्य गुंतवणूकदारांसाठी मार्जिनचे नवे नियम लागू होत आहेत. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ब्रोकरकडून मिळणाऱ्या मार्जिनचा लाभ आता गुंतवणूकदार घेऊ शकणार नाहीत. जेवढे पैसे ते अपफ्रंट मार्जिनसाठी ब्रोकरला देतील, तेवढ्याचेच शेअर ते खरेदी करू शकतील. शेअर बाजार रेग्यूलेटर सेबीने मार्जिन ट्रेडिंग नव्याने रचले आहे. आतापर्यंतच्या प्लेज सिस्टिममध्ये गुंतवणूकदारांची भूमिका कमी आणि ब्रोकरेज हाऊसची जास्त असायची. गुंतणूकदारांकडून अनेक कामं तेच करून घ्यायचे. नवीन कार्यपद्धतीमध्ये शेअर तुमच्या खात्यामध्येच राहतील आणि तिथेच क्लिअरिंग हाऊस प्लेज मार्क करेल. यामुळे ब्रोकरच्या खात्यात स्टॉक जाणार नाही. मार्जिन निश्चित करणे तुमच्या हातात असेल. 5. इंडिगो एअरलाइन सुरू करणार विमान उड्डाण बजेट एअरलाइन इंडिगो टप्प्याटप्प्याने त्यांची विमानसेवा सुरू करत आहे. 1 सप्टेंबरपासून प्रयागराज, कोलकाता तसंच सूरतमध्ये देखील उड्डाणे सुरू होतील. भोपाळ-लखनऊ या मार्गावर 180 सीट्स असणारी एअर बस-320 चालवण्यात येईल. हे उड्डाण आठवड्यातील 3 दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुरू असेल. याआधी कंपनीने  भोपाळहून प्रयागराज, आग्रा, कोलकात्ता, सूरत, अहमदाबाद याठिकाणी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली होती मात्र कोरोना काळात काही अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. आता कंपनीने प्रयागराज, कोलकाता तसंच सूरतमध्ये देखील उड्डाणांचे शेड्यूल जारी करून 1 सप्टेंबर आणि त्यानंतरच्या तारखांचे बुकिंग सुरू केले आहे. 6. जीएसटी भरपाई करण्यास विलंब झाल्यास 18 टक्के व्याज सरकारने अशी माहिती दिली आहे की, जीएसटी भरण्यास विलंब झाल्यास 1 सप्टेंबरपासून एकूण कर देयकावर व्याज आकारले जाईल. या वर्षाच्या सुरूवातीला जीएसटी देयकास उशीर झाल्यामुळे सुमारे 46000 कोटी रुपयांच्या थकीत व्याज वसुलीच्या निर्देशासंदर्भात या उद्योगाने चिंता व्यक्त केली होती. एकूण देयतेवर व्याज आकारले जाते. केंद्रीय आणि राज्य अर्थमंत्री यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेच्या 39 व्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की 1 जुलै 2017 पासून जीएसटी देयकास उशीर झाल्याच्या एकूण कर देयकावर व्याज आकारले जाईल आणि त्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. तथापि, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) 25 ऑगस्ट रोजी सूचित केले की 1 सप्टेंबर 2020 पासून एकूण कर देयकावर व्याज आकारले जाईल.
First published:

पुढील बातम्या