Home /News /money /

LPG Price: सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी कपात; नवीन दरानुसार किती स्वस्त मिळेल सिलेंडर?

LPG Price: सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी कपात; नवीन दरानुसार किती स्वस्त मिळेल सिलेंडर?

LPG Price

LPG Price

पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही कपात केली आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

    मुंबई, 1 जुलै : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरचे नवीन दर  (LPG Cylinder Price) जाहीर करण्यात आले आहेत. आज सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आला आहे. दिल्लीत इंडेन सिलेंडर 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे. एलपीजी सिलेंडरचे दर कोलकातामध्ये 182 रुपयांनी, मुंबईत 190.50 रुपयांनी, तर चेन्नईमध्ये 187 रुपयांनी कमी झाले आहेत. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने (Indian Oil) व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही कपात केली आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर स्वस्त किंवा महागही झाला नाही. त्याचा दर आजही 19 मे रोजीच्या दराने उपलब्ध आहे. मे महिन्यात दरवाढ जूनमध्ये इंडेनचे व्यावसायिक सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दोनदा दणका बसला होता. घरगुती सिलिंडरच्या दरात 7 मे रोजी महिन्यात प्रथमच 50 रुपयांनी वाढवण्यात आली होती आणि 19 मे रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीतही वाढ करण्यात आली होती. Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेलच्या दरांवर काय परिणाम? शहरानुसार 14.2 किलो सिलेंडरचा दर रुपयात >> दिल्ली - 1,003 रुपये >> मुंबई - 1,003 रुपये >> पुणे - 1,006 रुपये >> कोलकाता - 1,029 रुपये >> चेन्नई 1,019 रुपये >> लखनौ 1,041 रुपये >> जयपूर 1,007 रुपये >> पाटणा 1,093 रुपये चार दिवसांचा आठवडा अन् बरच काही, नवीन वेज कोड उद्यापासून लागू? कोणाला मिळणार लाभ? घरगुती एलपीजी सिलेंडर वर्षभरात 168.50 रुपयांनी महागला दिल्लीत गेल्या एका वर्षात घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर 834.50 रुपयांवरून 1003 रुपयांवर पोहोचला आहे. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 4 रुपयांची शेवटची वाढ 19 मे 2022 रोजी करण्यात आली होती. यापूर्वी 7 मे रोजी दिल्लीत 999.50 रुपये प्रति सिलेंडर दर होता. 7 मे रोजी एलपीजी सिलेंडर 22 मार्च 2022 रोजी 949.50 रुपयांच्या तुलनेत 50 रुपयांनी महागला. 22 मार्चलाही सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली होती. यापूर्वी, ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 899.50 रुपये होते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gas, LPG Price, Money

    पुढील बातम्या