मुंबई, 1 जुलै : तेल उत्पादक देशांच्या संघटनेने (ओपेक) पुरवठा वाढवण्याचे संकेत दिले आहेत, त्याचप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीची भीती असल्याने इंधनाचा वापर कमी होण्याची अपेक्षा आहे. या कारणांमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Prices) दोन दिवसांत 4 डॉलरने कमी झाली आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत सध्या प्रति बॅरल 114.8 डॉलर आहे, परंतु कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्ये बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. सरकारी रिफायनरी कंपन्या रशियाकडून स्वस्त तेल विकत घेऊन त्यांचे नुकसान भरून काढत आहेत. त्यामुळेच 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. चार दिवसांचा आठवडा अन् बरच काही, नवीन वेज कोड उद्यापासून लागू? कोणाला मिळणार लाभ? चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर » मुंबई - पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर » दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर » चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर » कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. आज पॅन-आधार लिंक न केल्यास भरावी लागणार दंडाची मोठी रक्कम तुम्ही नवीन दर याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.