मुंबई, 15 जून : गेल्या काही दिवसांपासून स्वयंपाकघरातील वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आता घरगुती वापरासाठी नवीन एलपीजी गॅस कनेक्शन (LPG Gas Connection) घेणेही महाग झाले आहे. पेट्रोलियम कंपन्या उद्यापासून म्हणजेच 16 जूनपासून वाढलेल्या किमती लागू करणार आहेत. Moneycontrol.com च्या रिपोर्टनुसार, कंपन्यांनी 14.2 किलोच्या सिलेंडरची सुरक्षा रक्कम 750 रुपयांनी वाढवली आहे. आता पाच किलोच्या सिलिंडरसाठीही 350 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. सिलेंडरसह पुरवल्या जाणार्या गॅस रेग्युलेटरच्या किमतीतही 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी दुसरे सिलिंडर घेतले तर त्यांना वाढीव रक्कम भरावी लागेल. येत्या काळात EMI आणखी वाढणार; फिच रेटिंग्सचा अंदाज, डिसेंबरपर्यंत RBI चे व्याजदर 5.9 टक्क्यापर्यंत पोहोचणार? किंमत किती वाढली? आता नवीन किचन कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकाला 2,200 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी ही रक्कम 1450 रुपये होती. अशाप्रकारे आता सिलेंडरची सुरक्षा म्हणून 750 रुपये अधिक जमा करावे लागणार आहेत. याशिवाय रेग्युलेटरसाठी 250, पासबुकसाठी 25 आणि पाईपसाठी 150 रुपये वेगळे द्यावे लागतील. त्यानुसार पहिल्यांदा गॅस सिलेंडर कनेक्शन आणि पहिल्या सिलेंडरसाठी ग्राहकाला एकूण 3,690 रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर कुणी दोन सिलिंडर घेतले तर त्याला सुरक्षा म्हणून 4400 रुपये द्यावे लागतील. Term Deposit: SBI सह ‘या’ बँकांच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ, ग्राहकांना होणार फायदा इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या म्हणण्यानुसार, आता पाच किलोच्या सिलेंडरसाठी 800 रुपयांऐवजी 1150 रुपये द्यावे लागतील. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PM Ujjwala Yojna) एलपीजी सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांनाही धक्का बसणार आहे. जर या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलेंडर डबल केला, म्हणजे दुसरा सिलिंडर घेतला, तर त्यांना वाढीव सुरक्षा रक्कम भरावी लागेल. नवीन कनेक्शन रेग्युलेटरसाठी ग्राहकांना आता 150 रुपयांऐवजी 250 रुपये खर्च करावे लागतील. कोविड-19 महामारीनंतर महागाई खूप वाढली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. याशिवाय खाद्यपदार्थ आणि भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढल्याने नागरिकांना घर चालवणे कठीण झाले आहे. त्यात आता सिलेंडर कनेक्शनचे दर वाढल्याने याचाही फटका सर्वसामन्यांना बसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.