मुंबई : दर महिन्याच्या १ तारखेला LPG सिलिंडरच्या दरात बदल होत असतात. आधीच गेल्या काही महिन्यांमध्ये महागाई वाढली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दरही दर महिन्याला कमी जास्त होत आहेत. या महिन्यात थोडा दिलासा मिळाला आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत गेल्या काही महिन्यांपासून कोणताही दिलासा मिळालेला नाही. डिसेंबर महिन्यातही सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात कोणत्याही प्रकारे वाढ केलेली नाही, म्हणजेच तुम्हाला वाढत्या किमतींपासून दिलासा मिळाला आहे. या महिन्यात गॅस सिलेंडर (एलपीजी सिलिंडर किंमत) बुक करणार असाल तर त्याआधी तुमच्या शहरात काय दर सुरू आहेत याबाबत जाणून घ्या.
IOCL ने जारी केले नवे दर
इंडियन ऑइलने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रकारचे गॅस सिलिंडर आणि कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 115.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. गेल्या 6 वेळा सतत 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात कपात केली जात होती.
ऐन लग्नमंडपात नवरीने नकार दिला तरी टेन्शन नको, तुमचा खर्च होईल कव्हर?
शेवटचे दर कधी बदलले?
१४ किलोग्रॅम गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये शेवटचा बदल ६ ऑक्टोबर रोजी झाला होता. ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत एलपीजीच्या किंमतीत १५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर 22 मार्चला किंमती 50 रुपयांनी वाढल्या होत्या.
कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमती
दिल्लीमध्ये कमर्शियल गॅसच्या किंमती 1744 रुपये तर मुंबईत 1696 रुपये आहेत. चेन्नईमध्ये 1891.50 रुपये मोजावे लागत आहेत.
किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय, कोण घेऊ शकतं लाभ?
इथे तुम्हाला www.mylpg.in टाइप करून ओपन करावं लागेल. मग तुम्हाला साईटच्या उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलेंडरचा फोटो दिसेल. तुमच्याकडे असलेल्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर टॅप करा. तिथे लॉगइन आयडी आणि पासवर्ड अपलोड करा आणि तिथे गॅसच्या किंमती तपासा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LPG Price